अकोला,दि.24- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 1702 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 1569 अहवाल निगेटीव्ह तर 133 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. दरम्यान 494 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, तर पाच जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. ( Akola corona update 24 may )
त्याच प्रमाणे काल (दि.23) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 81 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 53969(40636+13156+177) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर 133 + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 81= एकूण पॉझिटीव्ह- 214.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 257060 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 254029 फेरतपासणीचे 390 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 2641 नमुने होते. आजपर्यंत एकूण 256938 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 216302 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
133 पॉझिटिव्ह
आज दिवसभरात 133 अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 52 महिला व 81 पुरुषांचा समावेश आहे. त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे- मुर्तिजापुर-26, अकोट-25, बाळापूर-एक, तेल्हारा-14, बार्शी टाकळी-चार, पातूर-नऊ, अकोला-54. (अकोला ग्रामीण-17, अकोला मनपा क्षेत्र-37), दरम्यान काल (दि.23) रात्री प्राप्त रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांच्या अहवालात 81 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या एकुण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण संख़्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.
494 जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 29, आर्युवेदिक महाविद्यालय येथील चार, युनिक हॉस्पीटल येथील दोन, अकोला ॲक्सीडेंट येथील एक, सुर्यचंद्र हॉस्पीटल येथील तीन, हार्मोनी हॉस्पीटल येथील एक, देवसार हॉस्पीटल येथील पाच, यकीन हॉस्पीटल येथील दोन, बबन हॉस्पीटल येथील एक, ठाकरे हॉस्पीटल येथील एक, उशाई हॉस्पीटल येथील दोन, थोटे हॉस्पीटल येथील तीन, समर्पण हॉस्पीटल येथील दोन, जिल्हा स्त्री रुग्णालय येथील पाच, आयकॉन हॉस्पीटल येथील तीन, ओझोन हॉस्पीटल येथील एक, हॉटेल रिजेन्सी येथील चार, बिहाडे हॉस्पीटल येथील दोन, इंदिरा हॉस्पीटल येथील एक, देशमुख हॉस्पीटल येथील दोन, अर्थव हॉस्पीटल येथील दोन, आधार हॉस्पीटल येथील तीन, अवघाते हॉस्पीटल येथील तीन, काळे हॉस्पीटल येथील दोन, तर होम आयसोलेशन मधील 410 असे एकूण 494 जणांना डिस्चार्ज देण्यात आला,अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
पाच जणांचा मृत्यू
आज दिवसभरात पाच जणांच्या मृत्यूची नोंद झाली.
त्यात, धनीगाव ता.बाळापूर येथील 66 वर्षीय पुरुष असून या पुरुषास दि. 22 रोजी दाखल झाले होते.
रामटेकपुरा ता.अकोट येथील 71 वर्षीय महिला असून या महिलेस दि. 23 रोजी दाखल केले होते.
सांगळूद बोरगाव मंजू येथील 75 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 7 रोजी दाखल केले होते.
शांती नगर जूने शहर येथील 53 वर्षीय महिला असून या रुग्णास दि. 19 रोजी दाखल केले होते.
गजानन नगर, अकोला येथील 68 वर्षीय पुरुष रुग्ण असून या रुग्णास दि. 15 रोजी दाखल केले होते,अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.
6128 जणांवर उपचार सुरु
जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 53969(40636+13156+177) आहे. त्यात 1015 मृत झाले आहेत. तर 46826 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 6128 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.