• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, March 23, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

कोविड -१९ आढावा सभा :नियमांचे पालन होत नसल्यास गृह अलगीकरणाऐवजी संस्थात्मक अलगीकरण-जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

Media Desk by Media Desk
May 22, 2021
in अकोला, Featured, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
83 2
0
Jitendra Papalkar
24
SHARES
604
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.२२ जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता व रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांकडून नियमांचे पालन होत नसल्यास आता गृह अलगीकरणात रूग्णांना ठेवण्याची पद्धत बंद करावी व प्रत्येक गावात संस्थात्मक अलगीकरणात रुग्णांना ठेवून उपचार देण्यास सुरवात करा,असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले.

ग्रामीण भागातील वाढता कोरोना संसर्ग पाहता आज जिल्हा नियोजन भवनात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीस जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुरेश आसोले, अपर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे,उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, विश्वनाथ घुगे तसेच सर्व उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी आदी उपस्थित होते.यावेळी तालुका व गावनिहाय आढावा घेण्यात आला.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

यावेळी निर्देश देण्यात आले की, उपविभाग, तालुका आणि गावपातळीवर सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. त्यासाठी दररोज तालुकास्तरावर बैठका घेऊन आढावा घ्यावा व दररोजच्या कामाचे नियोजन करावे. प्रत्येक गावात होत असलेल्या विवाह समारंभावर लक्ष ठेवून जादा संख्या असल्यास कारवाई करावी. प्रत्यक्ष गावातील जबाबदारी ही स्थानिक ग्रामपंचायतीची जबाबदारी असून अन्य यंत्रणा त्यांना मदतीसाठी उपलब्ध असतील. बहुतेक ठिकाणी गृह अलगीकरणामधील रुग्ण जर कोविड नियमांचे पालन करत नसतील तर अशा लोकांना संस्थात्मक अलगीकरणात आणून उपचार करा. याबाबत गावातील लोकांकडून प्रतिसाद नसल्यास त्या त्या गावातच संस्थात्मक अलगीकरणाची सुविधा तयार करून लोकांना सक्तीने तेथे उपचारासाठी न्यावे, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी पापळकर यांनी दिले. निर्बंधांमधून सूट दिलेल्या सकाळच्या कालावधीत सुद्धा सोशल डिस्टनसिंगचे पालन होत नसल्यास त्या क्षणी कारवाई करावी,असेही निर्देश देण्यात आले. कृषी सेवा केंद्र व बँकांमधील गर्दीचेही नियमन करावे,अशा सुचना देण्यात आल्या. यावेळी गावातील चाचण्या, लसीकरण, प्रतिबंधात्मक आदेशाचे पालन व अंमलबजावणी, मृत्यू संख्या,प्रतिबंधित गावामधील सद्यस्थिती इ. बाबत आढावा घेण्यात आला.

Previous Post

अकोला जिल्ह्यात आज 358 पॉझिटीव्ह, 494 डिस्चार्ज, 11 मृत्यू

Next Post

तेल्हाऱ्यात दोन समाजात तणाव, परस्परा विरोधात गुन्हे दाखल,अखेर शहरवासीयांचा समजूतदारपणा आला कामी

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
तेल्हारा येथे दोन गटात धुमशान,धारदार शस्त्रने वार तिघे गंभीर जखमी,दोन अटकेत

तेल्हाऱ्यात दोन समाजात तणाव, परस्परा विरोधात गुन्हे दाखल,अखेर शहरवासीयांचा समजूतदारपणा आला कामी

water-supply

अकोलेकरांनो शहराचा पाणीपुरवठा दोन दिवस राहणार बंद

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.