• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, April 2, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

५९० जादा खाटा, ऑक्सिजन उपलब्धतेचे प्रशासनाचे नियोजन,बालकांच्या उपचारासाठी स्वतंत्र व्यवस्था-जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

Team by Team
May 20, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
80 1
0
Collector Akola
27
SHARES
577
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला- कोविड १९ च्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता, जिल्ह्यात रुग्णांच्या उपचारासाठी सुविधांची निर्मिती करण्यात येत आहे. त्यात ५९० जादा खाटा, वाढीव ऑक्सिजन उपलब्धता तसेच औषधे व मनुष्यबळ उपलब्धता या सोबतच लहान मुलांसाठी स्वतंत्र कोविड वार्ड बाबतही नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली आहे. कोविड १९ च्या अनुषंगाने तिसऱ्या संसर्ग लाटेचे अनुमान विविध आरोग्य संस्थांकडून वर्तविण्यात येत आहे. त्यादृष्टिने जिल्हा प्रशासन सज्ज असून प्रशासनाने याबाबत उपचार सुविधांचे नियोजन केले आहे.

वाढीव खाटांचे नियोजन

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

जिल्ह्यात सध्या शासकीय रुग्णालयांमध्ये ६४० खाटा तर खाजगी रुग्णालयांत ७६७ खाटा अशा एकूण १४०७ खाटांची उपलब्धता आहे. वाढत्या रुग्ण संख्येचे अनुमान लक्षात घेता डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात २०० खाटांचे जम्बो कोविड रुग्णालय तयार करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये २०० खाटांचे नियोजन असून त्यात ६० खाटा या केवळ लहान बालकां साठी राखीव असतील. याच ठिकाणी २० खाटांचा अतिदक्षता विभाग व ४० खाटांचा ऑक्सिजन पुरवठ्याची सुविधा आहे. याशिवाय शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ६० खाटा अतिरिक्त तयार करण्यात आल्या आहेत. तसेच प्रत्येक तालुक्यात २० याप्रमाणे बाळापूर, तेल्हारा, अकोट, बार्शी टाकळी याप्रमाणे एकूण ८० खाटांची संख्या वाढविण्यात आली आहे. तर पातुर येथील आयुर्वेद महाविद्यालयात ५० असे तालुकास्तरावर एकूण १३० खाटांचे नियोजज असून एकूण ५९० खाटांची वाढ नियोजित आहे.

ऑक्सिजन निर्मिती क्षमतेतही वाढ

जिल्ह्यात सद्यस्थितीत ७३ मेट्रिक टन इतकी ऑक्सिजन साठवण क्षमता आहे. त्यात वाढ करण्यात येत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १० मेट्रिक टन क्षमतेचा अतिरीक्त ऑक्सिजन टॅंक बसविण्यात येत आहे. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये १० मेट्रिक टन क्षमतेचा टॅंक तर हवेतून ऑक्सिजन तयार करण्याचे संयंत्र (पीएसए प्लॅंट) बसविण्याचेही नियोजन आहे. महाजेनकोच्या पारस येथील औष्णिक विद्युत केंद्राच्या ऑक्सिजन निर्मितीचा प्लॅंट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात स्थापित होईल. तर बाळापूर, अकोट, तेल्हारा, बार्शी टाकळी, पातूर तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा स्त्री रुग्णालय येथेही पीएसए प्लॅंट बसविण्यात येणार आहे.

औषधींची उपलब्धता

राज्य टास्क फोर्सने जारी केलेल्या निर्देशांप्रमाणे कोविड रुग्णांवर करावयाच्या उपचार कार्यपद्धतीनुसार सर्व कोविड केअर सेंटर, कोविड रुग्णालये येथे उपलब्ध खाटांची संख्या विचारात घेऊन जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली औषधींचे वितरण होत आहे. लहान मुलांसाठी द्यावयाच्या औषधांचीही उपलब्धता करण्यात आली आहे.

आवश्यक मनुष्यबळ

वाढीव खाटांची संख्या निहाय रुग्णांच्या उपचार व देखभालीसाठी लागणारे मनुष्यबळ कंत्राटी पद्धतीने आरोग्य विभागाकडून उपलब्ध करण्यात येत आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमाअंतर्गत मनुष्यबळाची उपलब्धता करण्याचे नियोजन हे जिल्हा शल्य चिकित्सकांकडे देण्यात आले आहे.

लहान मुलांसाठी विशेष कक्ष

लहान बालकांसाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे स्वतंत्र वार्ड तयार करण्यात येत आहे. त्यात लहान मुलांसाठी २० खाटांचा अतिदक्षता विभाग तसेच ऑक्सिजन पुरवठ्याची सोय असलेले ४० असे ६० खाटांचा सुसज्ज कक्ष असेल. तसेच लहान मुलांचे तज्ज्ञ डॉक्टर्सही नियुक्त करुन डॉक्टरांचा एक टास्क फोर्स तयार करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली आहे.

Tags: akola corona newsakola newsAkola news in Marathi
Previous Post

कोरोना काळात खाकीचा वृद्ध दाम्पत्याला मदतीचा हाथ

Next Post

अकोला जिल्ह्याच्या शेतकऱ्यावर अन्याय सहन केल्या जाणार नाही सोयाबीन मुग पिकाची भरपाई पीक विम्याची रक्कम त्वरित द्या-आमदार रणधीर सावरकर

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
केद्र सरकारने निश्चिंत केलेल्या आधार भुत किमतीच्या दरा व्यतिरिक्त 2 हजार रूपये प्रती क्विटल दराने बोनस द्या-आ. रणधीर सावरकर

अकोला जिल्ह्याच्या शेतकऱ्यावर अन्याय सहन केल्या जाणार नाही सोयाबीन मुग पिकाची भरपाई पीक विम्याची रक्कम त्वरित द्या-आमदार रणधीर सावरकर

corona test rapid test

आता घरबसल्या तुम्हीच करा कोरोना चाचणी! आयसीएमआरकडून रॅपिड अँटिजेन चाचणीला मान्यता

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.