हिंगणी (अजय लोखंडे): तेल्हारा तालुक्यातील हिंगणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर Covaxin- च्या लसीचे एकूण 55 लाभार्थीना लसीकरण करण्यात आले. गावातील ग्रामस्थ युवा व तसेच ज्येष्ठ नागरिकांनी लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. डॉक्टर ममता बियाणी स्वतः लक्ष देऊन मुख्यालयात हजर राहून वेळोवेळी तपासणी कामी मदत करीत आहेत यामुळे या केंद्रावर उत्कृष्ट नियोजन असल्यामुळे गैरसोय वर मात करण्यात आली आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रावर ज्येष्ठ आबाल वृद्ध करीता ज्यांना ऑनलाइन ची माहिती नाही त्यांना रजिस्ट्रेशन करून देऊन लसीकरण केल्या जात आहेत. यावेळी आरोग्य केंद्रावर डॅा. स्नेहा सावंत शालू नांदुरकर( आरोग्य सेविका) व रेखा गवई मंदा खडसे कल्पना सोनोने रंजना सोनोने अजय लोखंडे हरिओम नराजे व ज्ञानेश्वर कोरडे उपस्थित होते.