• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, March 26, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

जिल्ह्यात सहा ऑक्सीजन प्लांटची निर्मिती व अतिरीक्त ३१३ ऑक्सीजन बेड उपलब्ध ; ग्रामीण रुग्णालयात उपचार घ्यावे- पालकमंत्री ना.बच्चू कडू यांचे आवाहन

Team by Team
May 14, 2021
in अकोला, Corona Featured
Reading Time: 1 min read
77 1
0
पालकमंत्री
12
SHARES
555
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला– कोरोना विषाणुचा दुसऱ्या लाटेमुळे जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे,त्यामुळे शासकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयातील कोविड उपचार सुविधांवर अतिरिक्त भार पडतो आहे. तथापि,जिल्हा प्रशासनाने पालकमंत्री ना.बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करून कोविड उपचारांसाठी ग्रामीण भागात ३१३ ऑक्सिजन बेड व सहा ऑक्सीजन प्लांट निर्मितीसह अन्य उपचार सुविधा निर्माण केल्या आहेत. तरी ग्रामीण भागातील कोविड रुग्णांनी स्थानिक रुग्णालयात उपचार घ्यावे, असे आवाहन राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक  मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू  यांनी केले आहे.

             गुरुवार दि.13 रोजी झालेल्या कोविड-19 प्रतिबंधात्मक उपाययोजना आढावा बैठकीत ग्रामीण रुग्णालयात आवश्यक सोईसुविधा, वैद्यकीय अधिकारी व नर्सिंग स्टाफ उपलब्ध करुन त्या त्या भागातील रुग्णांना ग्रामीण रुग्णालयात उपचार सुविधा निर्माण करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार अकोट येथे 20 ऑक्सीजन बेड, तेल्हारा येथे 20, बार्शीटाकळी येथे 20, बाळापूर येथे 20, मुर्तिजापूर येथे 48, जिल्हा स्त्री रुग्णालय येथे 50, जिल्हा  परिषद कर्मचारी भवन येथे 35, तर पंजाबराव देशमुख विद्यापीठ येथील जॅम्बो हॉस्पीटल येथे 100 असे एकूण 313 ऑक्सीजन बेड उपलब्ध करण्यात आले आहेत. तर ग्रामीण रुग्णालय बार्शीटाकळी, बाळापूर, अकोट व तेल्हारा येथे प्रत्येकी एक तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय येथे दोन असे सहा ऑक्सीजन प्लांट निर्मिती होणार आहे. तसेच नॉन ऑक्सीजन बेड तयार करण्याचे कार्यादेश दिले असून या सुविधाही येत्या 15 दिवसात कोरोना रुग्णांच्या उपचाराकरीता उपलब्ध होतील. त्यामध्ये अकोट, तेल्हारा, बार्शीटाकळी व बाळापूर येथे प्रत्येकी 10, तर मुर्तिजापूर येथे 50, जिल्हा परिषद कर्मचारी भवन येथे 15 असे एकूण 105 नॉन ऑक्सीजन बेड उपलब्ध होणार आहे. तसेच  कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट येथे 50 व  खेडकर महिला वसतीगृह तेल्हारा येथे 50 बेडची व्यवस्था प्रस्तावित असून ती ही व्यवस्था येत्या 15 दिवसात पुर्ण होईल, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण यांनी दिली आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

दिलेल्या निर्देशानुसार उपलब्ध होत असलेल्या उपचार सुविधा, ऑक्सिजन बेड याबाबत पालकमंत्री ना.कडू यांनी समाधान व्यक्त केले असून ग्रामीण भागातील लोकांना शहराच्या ठिकाणी येऊन उपचार घेण्याऐवजी आपल्या नजीकच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार मिळतील. लोकांनी जवळच्या रुग्णालयात उपचार घ्यावे,असे आवाहन ही त्यांनी केले आहे. जादा उपचाराची आवश्यकता भासल्यास त्यांना नंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवता येईल, असेही त्यांनी सांगितले.

Tags: akola newsAkola news in Marathibachhu kadu akola
Previous Post

पुन्हा एकदा स्थलांतरण करणाऱ्या मजुरांच्या मदतीला धावली खाकी वर्दी

Next Post

Akola Corona Cases: 440 पॉझिटीव्ह,13 मृत्यू, 570 डिस्चार्ज

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
corona covid 19

Akola Corona Cases: 440 पॉझिटीव्ह,13 मृत्यू, 570 डिस्चार्ज

चाचणी

येत आहे तिसरी लाट, नका पाहू कशाची वाट!युद्धस्तरावर "न भूतो, न भविष्यती" उपाययोजना करण्याची गरज

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.