तेल्हारा(प्रतिनिधी)- सकल मराठा तेल्हारा तालुका तर्फे आज श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक इथे सुप्रीम कोर्टाने आज मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत निर्णय दिला त्यामध्ये आरक्षण रद्द करण्यात आले त्यामुळे संपूर्ण मराठा समाज हा पेटून उठला असून आरक्षणासाठी दिलेला लढा हा अजून किती बलिदान मागतो यावर समाजाने आलेल्या निर्णयाचा निषेध व्यक्त केला आहे.
तेल्हारा तालुक्यातील मराठा समाज हा अत्यंत मजबूत संघटित असून मराठा मोर्चा झाल्यापासून समाजाने मोठ्या प्रमाणात त्याग केला आहे. मराठा समाजाचे लाखोंचे मोर्चे निघाले मात्र कुठेही शिस्तभंग किंवा तोडफोड अशी कुठलीही घटना झाली नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात मोर्चे निघून शांततेची व शिस्तीची मोर्चानं नवीन पद्धत लागली ती फक्त मराठा समाजामुळे आणि एवढा सुसंस्कृत समाज असून सुद्धा मराठा समाजाच्या मूलभूत मागण्यांसाठी पुकारलेला बंद किंवा मराठा समाजाच्या आरक्षणासाठी झालेले शहिद यांना त्यांच्या त्यागाचे बलिदानाचे जर आरक्षण रद्द करून परिणाम भोगावे लागत असेल तर ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. मराठा समाज लढवय्या असूनही बुद्धिचातुर्य ठासून भरलेल्या युवक या समाजामध्ये आहेत. मात्र पहिले सिलिंग च्या नावाखाली मराठा समाजाच्या जमिनी त्यांच्याकडून काढून घेण्यात आल्या व त्यांना अनपेक्षित आर्थिक दुर्बलता त्यामुळे येत गेली.
आज मराठा समाजातील बहुतांशी लोक हे भूमिहीन असून शिक्षण घेण्यासाठी आवश्य असलेली आपले शैक्षणिक शुल्क भरण्याला त्रास होत आहे सत्तर-पंचाहत्तर परसेंट घेऊन सुद्धा शैक्षणिक प्रवेश मिळत नाही. तसेच आरक्षण नसल्यामुळे मराठा समाजातील युवकांची लायकी असून सुद्धा त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत यामुळे मराठा समाजाने या अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यासाठी मोठ्याप्रमाणात आंदोलने केली त्या आंदोलनाच्या स्वरूपात मराठ्यांना आरक्षण मिळालं पण आज त्यांची न्यायालीन लढाईमध्ये आरक्षण रद्द करण्यात आले त्यामुळे मराठा समाजातील नवतरुण शैक्षणिक मुलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असून संपूर्ण मराठा समाज पेटून उठला आहे. त्याचेच प्रतीक म्हणून तेल्हारा तालुका सकल मराठा तर्फे तीव्र शब्दात निषेध नोंदविण्यात आला आहे.