• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, April 1, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

अमरावती: महिला वन कर्मचाऱ्याचा कार्यालयात चक्क दारू पिऊन धिंगाणा घातला

Media Desk by Media Desk
September 25, 2021
in Featured, गुन्हा, विदर्भ
Reading Time: 1 min read
81 1
0
अमरावती
13
SHARES
588
VIEWS
FBWhatsappTelegram

अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील वनपरिक्षेत्र कार्यालयात लेखा विभागात कार्यरत असलेल्या एका महिलेने चक्क कार्यालयात दारू पिऊन धिंगाणा घातला. याबाबत माहिती मिळताच तातडीने पोलिसांचं पथक दाखल झालं. त्यानंतरही या महिलेने धिंगाणा सुरूच ठेवला. तिला अटकाव करण्याचा प्रयत्न केला असताना महिला पोलिसावर हात उगारण्यापर्यंत तिची मजल गेली. या प्रकरणी महिलेवर परतवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला ताब्यात घेण्यात आले आहे.

अमरावती परतवाडा येथील वनपरिक्षेत्र कार्यालयात लेखा विभागातील ही महिला कार्यरत आहे. ही बुधवारी दारू पिऊन कार्यालयात धिंगाणा घालू लागल्याने इतर कर्मचारी अवाक् झाले. तिला समजावण्याचा प्रयत्न केला असता दारूच्या नशेत धुंद असलेली ही महिला कुणाचंच ऐकायला तयार नव्हती. शेवटी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी पोलिसांना पाचारण केले. त्यानंतर काही वेळातच महिला पोलिसांसह पथक कार्यालयात दाखल झालं. या महिलेला ताब्यात घेण्याचा प्रयत्न महिला पोलिसांनी केला असता त्यांच्याशी हुज्जत घालण्यात आली. पोलिसांच्या वाहनात तिला बसवले असता दरवाजा उघडून ती परत बाहेर आली. तिथे महिला पोलिसांना तिने शिवीगाळ केली. तिला पकडण्याचा प्रयत्न केला असता एका महिला पोलिसावर तिने थप्पड मारली. त्यानंतर पोलिसांनी तिला चांगलाच हिसका दाखवला. याप्रकरणी सदर महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला ताब्यात घेण्यात आले आहे.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

वाचा: आश्चर्यच ! महिलेने एकाच वेळी ९ बाळांना जन्म दिला

दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर वनविभागात सेवेत असलेल्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. कामाच्या ठिकाणी महिलांना संरक्षण मिळावे, वरिष्ठांकडून त्यांचा छळ होऊ नये यासाठी शासनस्तरावर अनेक पावले उचलली जात आहेत. अशावेळी परतवाडा वनपरिक्षेत्रात चक्क महिला कर्मचाऱ्यानेच दारू पिऊन धिंगाणा घातल्याने सगळेच हादरले आहेत. या प्रकाराने एक वेगळेच आव्हान उभे ठाकले आहे.

Tags: अमरावती
Previous Post

आश्चर्यच ! महिलेने एकाच वेळी ९ बाळांना जन्म दिला

Next Post

Arijit च्या आईला केले हॉस्पिटलमध्ये भरती, A- ब्‍लडची गरज

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
Arijit

Arijit च्या आईला केले हॉस्पिटलमध्ये भरती, A- ब्‍लडची गरज

चाचण्या

ब्रेकिंग! राज्याच्या आरोग्य विभागात १६ हजार पदांची भरती होणार

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.