• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, July 1, 2025
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Corona Featured

Akola: कोरोनाने आणखी 11 मृत्यू, 336 पॉझिटीव्ह

Team by Team
May 1, 2021
in Corona Featured, अकोला
Reading Time: 1 min read
77 1
0
Corona Cases
23
SHARES
556
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला: दि.30 दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 1754 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 1418  अहवाल निगेटीव्ह तर 336 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. दरम्यान 468 जणांना  डिस्चार्ज  देण्यात आला, तर 11 जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

  त्याच प्रमाणे दि.29 रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 201 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे  आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 40160(31095+8888+177) झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आज दिवभरात एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर 336 व रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 201 असे एकूण पॉझिटीव्ह 537 आहेत.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

          शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 206145 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 203268 फेरतपासणीचे 387 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 2490 नमुने होते. आजपर्यंत एकूण 206061 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 174966 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

336 पॉझिटिव्ह

दि.30 दिवसभरात ३३६ अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात १३९ महिला व १९७ पुरुषांचा समावेश आहे. त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे-

मुर्तिजापुर-५२, अकोट-३७, बाळापूर-३४, तेल्हारा-२३, बार्शी टाकळी-१९ पातूर-१७, अकोला-१५४. (अकोला ग्रामीण-२८, अकोला मनपा क्षेत्र-१२६)

दरम्यान दि. 29 रात्री प्राप्त रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांच्या अहवालात 201 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या एकुण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण संख़्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.

11 जणांचा मृत्यू

दि.30 दिवसभरात ११ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात मोठी उमरी येथील ७२ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. २३ रोजी दाखल करण्यात आले होते. तर अन्य लोकमान्य नगर ता.बाळापूर येथील ८३ वर्षीय महिला असून या रुग्णास दि. २४ रोजी दाखल करण्यात आले होते, जूने राधाकिसन प्लॉट येथील ७१ वर्षीय महिला असून या रुग्णास  दि. २८ रोजी दाखल करण्यात आले होते, कान्हेरी गवळी ता. बाळापूर येथील ७० वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. ७ रोजी दाखल करण्यात आले होते. कोथळी ता. बार्शीटाकळी  येथील ५५ वर्षीय पुरुष असून या रुग्णास  दि. १५ रोजी दाखल करण्यात आले होते, शिवपूर येथील २० वर्षीय महिला असून या रुग्णास दि. २८ रोजी दाखल करण्यात आले होते. तसेच राहेर ता. पातूर येथील ७४ वर्षीय पुरुष रुग्णास दि. १५ रोजी दाखल करण्यात आले होते, तेल्हारा येथील ८५ वर्षीय पुरुष रुग्णास दि. २७ रोजी दाखल करण्यात आले होते. तसेच तीन जणांचे खाजगी रुग्णालयात मृत्यू झाले. त्यात  मोठी उमरी येथील ६२ वर्षीय महिला असून त्याना दि. २७ रोजी दाखल करण्यात आले होते, तर अन्य बाळापूर येथील ६८ वर्षीय पुरुष असून त्याना दि. २० रोजी दाखल करण्यात आले होते, खदान येथील ७८ वर्षीय महिला असून त्याना दि. २३ रोजी दाखल करण्यात आले होते, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

  468 जणांना डिस्चार्ज

दरम्यान दि.30 दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ३४, केअर हॉस्पीटल येथील दोन, बिहाडे हॉस्पीटल येथील आठ, कोविड केअर सेंटर अकोट येथील १४, कोविड केअर सेंटर तेल्हारा  येथील तीन, हॉटेल स्कायलार्क येथील एक, कोविड केअर सेंटर बाळापूर येथील एक, कोविड केअर सेंटर पास्टूल येथील सहा, अकोला ॲक्सीडेंट येथील चार, युनिक हॉस्पीटल येथील तीन, आरकेटी आर्युवेदिक महाविद्यालय येथील एक, सुर्यचंद्र हॉस्पीटल येथील एक, देवसार हॉस्पीटल येथील पाच, हॉटेल रिजेन्सी येथील चार, आयकॉन हॉस्पीटल येथील दोन, ओझोन हॉस्पीटल येथील तीन, सहारा हॉस्पीटल येथील दोन,  देशमुख हॉस्पीटल येथील दोन, अर्थव हॉस्पीटल येथील एक, आधार हॉस्पीटल येथील एक, तर होम आयसोलेशन मधील ३७० असे एकूण ४६८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

5302 जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 40160(31095+8888+177) आहे. त्यात 689 मृत झाले आहेत. तर 34169 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 5302 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

Tags: akola newsAkola news in Marathicorona cases in akolacorona update akola
Previous Post

१८ ते ४४ वर्षे वयोगटातील लसीकरणास (दि.१ मे) पासून जिल्ह्यात सुरुवात

Next Post

अकोला : ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत कडक निर्बंध 15 मेपर्यंत कायम

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
लॉकडाऊन

अकोला : 'ब्रेक द चेन' अंतर्गत कडक निर्बंध 15 मेपर्यंत कायम

वॉशरूममधून परतलेल्या रुग्णाला बेड मिळाला नाही, म्हणून शेजारच्या रुग्णाला जमिनीवर आपटले; जागीच मृत्यू

मलकापुरातील कोविड सेंटरचा वीजपुरवठा खंडित झाल्याने रुग्णाचा मृत्यू,नातेवाईकांचा आरोप

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.