दानापूर (प्रतिनिधी)– तेल्हारा तालुक्यातील दानापूर येथील समशान भूमी आता सगळ्या जिल्ह्याचे लक्ष वेधून घेत आहे.स्मशानभूमीत म्हटलं की लोकांच्या डोळ्या पुढे येत ते प्रेत यात्रा तो प्रचंड जनसमुदाय , समशान भूमीतील पडक शेड, व समशान शांतता .मात्र येथील उतररेकडील व दक्षिणेकडील स्मशानात आता चक्क वाढदिवस साजरे होत आहेत हे नवलच.
येथील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार सुनिलकुमार धुरडे यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने वाह्यात खर्च न करता या दोन्ही समशान भूमीत वाढत्या तापमाना नुसार पक्षाच्या पाणी पिण्याची व्यवस्था केली . व त्यांना पाण्याचे माती पासून बनवलेले मनमोहक अशा गगुल्या(पात्र)भेट दिल्या त्याचं बरोबर समशान भूमीत येणाऱ्या लोकांना नियमाचे पालन करावे या करीता नियमावलीचे पोस्टर लावण्यात आले. या सुसजय फुलांनी नटलेल्या समशान भूमीत व निसर्गरम्य वातावरणात येथिल दक्षिणेकडील समशान भूमीत श्रमदान करणाऱ्या गावकर्यांच्या उपस्थितीत पत्रकार सुनिलकुमार धुरडे यांनी पक्षांना पाणीची व्यवस्था करून दिल्या बद्दल समशान भूमी समितीचे जेष्ठ गणपतराव रौदळे व श्याम कुमार ढाकरे यांच्या हस्ते पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते ,पत्रकार सुनिलकुमार धुरडे यांचा वाढदिवस समशान भूमीत साजरा करण्यात आला.
यावेळी उपसरपंच सागर ढगे, सुरेश खोडे , गोपाल व्यास, ग्रामपंचायत सदस्य रविंद्र तायडे, गणेश सागुणवेडे,भास्कर दांदळे,पंजाब रौदळे,शालीग्राम झाडोकार,रामचंद्र वाघमारे, महादेव राऊत, नरहरी हागे,गोपाल भड, हागे,गजानन मानकर, संतोष झगडे,गणेश बावस्कर, भिमराव पहुरकर, बोडखे भूषण हागे ,व सर्व समशान भूमीचे सदस्य यावेळी उपस्थित होते.
अंधश्रध्येला दिला फाटा.
स्मशानभूमी म्हटलं की अंधश्रद्धा आलीच प्रेत जाळणे, जुन्या लोकांनी या स्मशानभूमीत भूत, मुजा, असे अनेक प्रकारचे नाव आपल्याला माहीत आहेत , स्मशानभूमी च्या परिसरात गेलं तरी वादळी शांतता पसरलेली असते मात्र दानापूर येथिल स्मशानभूमीत असं चित्र पहावयास मिळत नाही, ही सगळी अंधश्रद्धा आहे . तर ,या ठिकाणी चक्क महिला ,लहान मुले, तर आता तर वाढदिवस साजरे केले जातात हे विशेष.