Iphone मोबाइलच्या नादात फेसबुक फ्रेंडने परदेशातून पाठवलेला आयफोन कस्टम विभागातून सोडविण्याच्या बहाण्याने एका ज्येष्ठ नागरिक महिलेची सुमारे चार कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.
फेसबुक फ्रेंडने परदेशातून पाठवलेला आयफोन कस्टम विभागातून सोडविण्याच्या बहाण्याने एका ज्येष्ठ नागरिक महिलेची सुमारे चार कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. कस्टम विभागाचे शुल्क म्हणून महिलेला वेळोवेळी विविध बँक खात्यात पैसे भरण्यास सांगण्यात आले. त्यानुसार त्यांनी ६७ खात्यांत पैसे पाठवले. मात्र, त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
या प्रकरणी एका ६० वर्षीय महिलेने सायबर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरून संबंधित फेसबुक खातेधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिला एका मोठ्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर काम करीत आहे. गेल्या वर्षी आरोपीने त्यांना फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. तक्रारदार महिलेने ती स्वीकारली. त्यानंतर आरोपीने त्यांच्याशी फेसबुकद्वारे संवाद साधून ओळख वाढवली. त्यानंतर आरोपीने त्यांना व्हॉट्स अॅप क्रमांक दिला. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये ‘वाढदिवसानिमित्त आयफोन कंपनीचा मोबाइल गिफ्ट म्हणून पाठवला आहे.
Iphone फोनचे पार्सल दिल्लीतील कस्टम ऑफिसमध्ये आले असून, हे पार्सल सोडविण्यासाठी कस्टम विभागाला पैसे भरावे लागतील,’ असे आरोपीने फिर्यादी महिलेला सांगितले. सुरुवातीला त्यांनी किरकोळ रक्कम भरण्यास सांगितली. त्यानुसार महिलेने पैसे बँक खात्यात पाठवले. त्यानंतर आरोपींनी तक्रारदार महिलेला धमकाविण्यास सुरुवात केली. ‘तुमच्या मालमत्तेची माहिती आयकर विभागाला कळवू. ते तुमच्यावर धाड टाकतील, तुमची बदनामी होईल, तुमच्यावर गुन्हा दाखल होईल,’ असे सांगून सायबर चोरट्यांनी त्यांना भिती दाखविण्यास सुरुवात केली. त्यामुळे घाबरलेल्या महिलेने ते सांगतील त्याप्रमाणे त्यांना पैसे देण्यास सुरुवात केली. पोलिस निरीक्षक अंकुश चिंतामणी अधिक तपास करीत आहेत.
‘कस्टम’च्या नावाखाली फसवणूक
फेसबुक फ्रेंडकडून ‘परदेशातून महाग भेटवस्तू पाठवली असून, ती कस्टम विभागातून सोडवून घ्या,’ अशी विनंती केली जाते. भेटवस्तू सोडवून घेण्यासाठी सुरुवातीला किरकोळ रक्कम भरण्यास सांगितली जाते. त्यानंतर विविध कारणे देऊन रक्कम वाढवली जाते. या पद्धतीने फसवणूक झाल्याच्या अनेक तक्रारी गेल्या काही वर्षभरात दाखल झाल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी महागड्या भेटवस्तूच्या अमिषाला बळी पडू नये. तसेच, सोशल मीडियावरील ओळखीला भुलून आर्थिक व्यवहार करू नयेत, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.
तसेच, सहा मोबाईल क्रमांकावरून फिर्यादीला फोन करून २५ बँकातील ६७ वेगवेगळ्या खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यास सांगितले. फिर्यादी महिलेने आठ एप्रिलपासून आजतागायत तीन कोटी ९८ लाख ७५ हजार ५०० रुपये ट्रान्सफर केले आहे.