• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 27, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

अकोला जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच, 281 पॉझिटीव्ह, 154 डिस्चार्ज, आठ मृत्यू

Team by Team
April 20, 2021
in अकोला, Corona Featured, कोविड १९
Reading Time: 1 min read
83 1
0
अकोला जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच, 281 पॉझिटीव्ह, 154 डिस्चार्ज, आठ मृत्यू
44
SHARES
598
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला : दि.20 दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 1727 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 1446  अहवाल निगेटीव्ह तर 281 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. दरम्यान 154  जणांना  डिस्चार्ज  देण्यात आला, तर आठ जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

  त्याच प्रमाणे काल (दि.19) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 201 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे  आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 34683(27117+7389+177)झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आज दिवभरात एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर 281 व रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 201 असे एकूण पॉझिटीव्ह 482 आहेत.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

          शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 185665  नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 182914 फेरतपासणीचे 385 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 2366   नमुने होते. आजपर्यंत एकूण 185486 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 158369 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

हे पण वाचा : राज्यात आज रात्रीपासून नवी नियमावली; काय बंद आणि काय सुरू? वाचा संपूर्ण माहिती

281 पॉझिटिव्ह

दि.20 दिवसभरात २८१ अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात १११ महिला व १७० पुरुषांचा समावेश आहे. त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे-

मुर्तिजापुर-१८, अकोट-पाच, बाळापूर-१६, तेल्हारा-१५, बार्शी टाकळी-नऊ, पातूर-सहा, अकोला-२१२. (अकोला ग्रामीण-३३, अकोला मनपा क्षेत्र-१७९)

दरम्यान काल (दि. 19) रात्री प्राप्त रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांच्या अहवालात  201 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या एकुण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण संख़्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.

आठ जणांचा मृत्यू

दि.20 दिवसभरात आठ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात खिरपूरी ता.बाळापूर येथील ८१ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. ७ रोजी दाखल करण्यात आले होते. तर अन्य खडकी येथील ७५ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. १८ रोजी दाखल करण्यात आले होते, म्हैसांग येथील ५१ वर्षीय महिला असून या रुग्णास  दि. १५ रोजी दाखल करण्यात आले होते, रिधोरा ता.बाळापूर येथील ७७ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि.१५ रोजी दाखल करण्यात आले होते, तर मलकापूर येथील ६५ वर्षीय पुरुष असून या रुग्णास   दि. १९ रोजी दाखल करण्यात आले होते, मुर्तिजापूर येथील ५३ वर्षीय महिला असून या रुग्णास दि.१९ रोजी मृतावस्थेत दाखल करण्यात आले होते. तर ४५ ते ५० वयोगटातील अज्ञात पुरुष रुग्णास दि. १९ रोजी मृतावस्थेत दाखल करण्यात आले होते. तसेच रिधोरा ता.बाळापूर येथील ८० वर्षीय पुरुष रुग्णास दि.११ रोजी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

154  जणांना डिस्चार्ज

दरम्यान दि.20 दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ४१, बिहाडे हॉस्पीटल येथून आठ, आयकॉन हॉस्पीटल येथून दोन, आरकेटी येथून २७, इंदिरा हॉस्पीटल येथून आठ, युनिक हॉस्पीटल येथून दोन, ठाकरे हॉस्पीटल मुर्तिजापूर येथून दोन, अवघाते हॉस्पीटल येथून सात, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथून एक, अकोला ॲक्सीडेंट येथून पाच, कोविड केअर सेंटर बार्शीटाकळी येथून सहा, नवजीवन हॉस्पीटल येथून चार, कोविड केअर सेंटर बाळापूर येथून एक, तर होम आयसोलेशन मधील ४० असे एकूण १५४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

4993  जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 34683(27117+7389+177) आहे. त्यात 575 मृत झाले आहेत. तर 29115 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 4993  जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

Tags: akola corona updatescorona cases in akola
Previous Post

दहावीची परीक्षा रद्द : बारावीबाबत मंत्रिमंडळ बैठकीत ‘हा’ निर्णय

Next Post

बस्स….कडक निर्बंध लावूनही लोक फिरत असतील तर कारवाई कराच- गृहराज्यमंत्री देसाई

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
बस्स….कडक निर्बंध लावूनही लोक फिरत असतील तर कारवाई कराच- गृहराज्यमंत्री देसाई

बस्स....कडक निर्बंध लावूनही लोक फिरत असतील तर कारवाई कराच- गृहराज्यमंत्री देसाई

akot-shivsena

आ.संजय गावंडे यांच्या वरील दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्या, शिवसेनेची मागणी

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.