कारंजा(वाशिम)- देशात आज कोरोनाचा प्रादुर्भाव पसरत असल्याने संपूर्ण देशात मिनी लॉकडाऊन सुरु झाले अशातच अनेक गोरगरिबांना उपाशी राहण्याची परिस्थिती उदभली आहे त्याचाच प्रत्यय आज कारंजा बस स्टॉप परिसरात पहायला मिळाला आज दि.२० एप्रिल वेळ सकाळी १०:०० वाजता बस स्थानक येथे चेतन राऊत व कृष्णा चव्हाण हे नेहमी प्रमाणे आपल्या कामा निमित्त जातांना त्यांना एका वृद्ध महिला उपाशी असलेली दिसली भुकेने व्याकुळ झालेल्या वृद्धेला पाहून चेतन राऊत याने स्वतःसाठी आणलेला डबा त्या वृद्ध महिलेला खायला दिला व जवळ असलेले पैसे सुद्धा दिले. त्यात विशेष म्हणजे ही घटना शिवभोजन थाळी मिळणाऱ्या परिसरात झाली आहे. कोरोना सारख्या भयान परिस्थितीत मधे आज सुद्धा माणुसकी जिवंत आहे यांचे हे उत्तम उदाहरण आहे या तरूणांनी आज समाजापुढे मांडले आहे त्यांच्या या कार्यामुळे सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.
हे पण वाचा : राज्यात आज रात्रीपासून नवी नियमावली; काय बंद आणि काय सुरू? वाचा संपूर्ण माहिती