अकोला : अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात आज (दि.१७) शनिवारी दुपारी ३ वाजून ४५ मिनिटांनी भूकंपाचा सौम्य धक्का बसला. हा धक्का ३ रिश्टर स्केलवर झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. अकोल्यापासून पश्चिमेला बाळापूरनजीक १९ किमी. अंतरावर भूकंपाचे केंद्र होते अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.
अनुक्रमे २०.७५ व ७६.८३ लाँग आणि लाँजीट्यूट असे दाखवले आहे. नागरिकांनी घाबरून न जाण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. यामध्ये कोणतीही जिवीत हानी झाली नसल्याचे ही सांगण्यात आले.