नवी दिल्ली : देशात आता कोरोनाची दुसरी व भयानक लाट आलेली आहे. विशेषतः महाराष्ट्रात या दुसर्या लाटेने कहर केला आहे. संशोधकांनी म्हटले आहे की या दुसर्या लाटेतील कोरोनाच्या संक्रमणाने फुफ्फुसांचे नुकसान होण्याचा वेगही वाढला आहे. कोरोनाचे नवे स्ट्रेन दोन-तीन दिवसांमध्येच फुफ्फुसांना 50 ते 70 टक्के संक्रमित करतो. पहिल्या लाटेवेळी त्यासाठी सुमारे सात दिवस लागत असत.
सध्या कोरोना संक्रमणामुळे दोन ते तीन दिवसांमध्येच विषाणू फुफ्फुसात मोठ्या प्रमाणात फैलावून त्याची हानी करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मृत्युमुखी पडणार्या लोकांची संख्याही वाढत चालली आहे. सामान्यतः रुग्णामध्ये कोरोना संक्रमणाची पुष्टी होण्यासाठीच दोन ते तीन दिवस लागतात. अँटिजेन टेस्ट, आरटी-पीसीआर किंवा सीटी स्कॅनचा रिपोर्ट येण्यासाठी 24 ते 36 तास लागतात. तोपर्यंत संक्रमण फुफ्फुसांचे नुकसान करते आणि 50 ते 70 टक्क्यांपर्यंत फैलावते. पल्मोनोलॉजिस्टनी दिलेल्या माहितीनुसार वीस वर्षे रोज धुम्रपान केल्याने फुफ्फुसांचे जितके नुकसान होते तितके यामुळे दोन ते तीन दिवसांमध्येच होत आहे.