शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून गुरुवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १,९१९ अहवाल प्राप्त झाले. यापैकी १,८६० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १,७३३ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये मोठी उमरी येथील नऊ, रामदास पेठ व जीएमसी येथील प्रत्येकी सहा, मलकापूर आणि पोलीस हेडक्वार्टर येथील प्रत्येकी पाच, तेल्हारा आणि राऊतवाडी येथील प्रत्येकी चार, वरुड बिऱ्हाडे, आळशी प्लॉट, खडकी, सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी तीन, वांगरगाव, शास्त्री नगर, गांधी चौक, पोळा चौक, न्यू तापडीया नगर, जठारपेठ, डाबकी रोड, द्वारका नगर, व्याळा, बाळापूर, वृंदावन नगर, उगवा, यमुना नगर, रजपूतपुरा, येथील प्रत्येकी दोन तर उर्वरित पारखेड, उकडीबाजार, जवाहर नगर, गोकुळ कॉलनी, पीकेव्ही,कोठारी वाटिका, जुने शहर, ताज नगर, दीपक चौक, रामी हेरीटेज, अकोट फैल, शंकरनगर, कौलखेड, दहिहांडा, खिरपुरी खु., गोरव्हा, जीएमसी क्वार्टर, जापान जीन, अक्कलकोट, मित्रनगर, नायगाव, राजंदा, मनोरमा कॉलनी, जांबा बु., गोकुळ कॉलनी, गुडदी, आदर्श कॉलनी, गायत्री नगर, तापडीया नगर, बार्शीटाकळी, महसूल कॉलनी, टाकळी बु., डोंगरगाव, उमरी नाका, शिवर, हरिहरपेठ, फडके नगर, शिवसेना वसाहत, बालाजी नगर, महात्मा फुले नगर, वाडेगाव, किनगाव, कपिलानगर, शिवनी, अकोट, बोरगाव मंजू, पारस, हमजाप्लॉट, माळीपुरा, पातूर आणि कान्हेरी गवळी येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
सायंकाळी अकोट येथील सहा, मूर्तिजापूर येथील पाच, कौलखेड, मलकापूर, पारस येथील प्रत्येकी तीन, सोनाेरी, व्याळा,डाबकी रोड, शिवाजीनगर, जुने शहर, बाळापूर येथील प्रत्येकी दोन, गुरुकुल नगर, कानशिवणी, धोतरा, रजपुतपुरा, कीर्तीनगर, कच्ची खोली, रचना कॉलनी, खडकी, वाई, कुटासा, पणज, पाथर्डी, चिखली, शंकरनगर, तुकाराम चौक, चान्नी, गाजिपुर, बटवाडी, कासारखेड, कोलोरी, हम्जा प्लॉट, म्हैसपूर, दुर्गा चौक आणि विवरा येथील प्रत्येकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
तीन महिला दगावल्या
कोरोनावर उपचार सुरु असलेल्या अकोट फैल येथील ४७ वर्षीय महिला, कासारखेड ता. बार्शी टाकळी येथील ६५ वर्षीय महिला व अकोट येथील ६२ वर्षीय महिला अशा तीन कोरोना बाधित रुग्णांचा गुरुवारी मृत्यू झाला.
२८७ जणांचा डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून नऊ, उपजिल्हा रुग्णालय मूर्तिजापूर येथून पाच, आयकॉन हॉस्पिटल येथून नऊ, कोविड केअर सेंटर बार्शीटाकळी येथून एक, कोविड केअर सेंटर अकोट येथून चार, सूर्यचंद्र हॉस्पिटल येथून तीन, सहारा हॉस्पिटल येथून तीन, नवजीवन हॉस्पिटल येथून तीन, ओझोन हॉस्पिटल येथून पाच, बिहाडे हॉस्पिटल येथून चार, युनिक हॉस्पिटल येथून एक, उम्मत हॉस्पिटल मूर्तिजापूर येथून तीन, बॉईज होस्टेल येथून तीन , हॉटेल स्कायलार्क येथून दोन, हॉटेल रिजेन्सी येथून चार तर होम आयसोलेशनमधील २२८ अशा एकूण २८७ जणांचा डिस्चार्ज देण्यात आला.
३,७७१ ॲक्टिव्ह रुग्ण
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २९,८५६ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल २५,५९६ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ४८९ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ३,७७१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.