• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, March 18, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

अकोला शहरातील ऑटोस्टॅण्ड चा गंभीर प्रश्न लवकरच सुटणार,ऑटोरिक्षा साठी 20 थांब्याना मंजुरी

Team by Team
April 1, 2021
in Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
78 1
0
auto satand in akola
46
SHARES
564
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला(प्रतिनिधी)– पश्चिम विदर्भातील सर्वात जास्त ऑटो असणारे शहर म्हणून अकोला प्रसिध्द आहे, नेमकी हीच ओळख अकोल्या साठी डोकेदुखी ठरत आहे, लोकसंख्या व गरजेच्या कितीतरी जास्त प्रमाणात ऑटो अकोला शहरात धावतात, बेरोजगारी हे एक प्रमुख कारण असले तरी इतरही अनेक कारणे ह्या मागे आहेत, आज अकोला शहरात 6500 ते 7000 ऑटो धावतात,परंतु एवढ्या मोठ्या संख्येने धावत असलेल्या ऑटो साठी ज्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक होत्या त्या दुर्दवाने अजूनही नाहीत, अशोक वाटिका चौक ते रेल्वे स्टेशन ह्याच मार्गावर ह्या एकूण ऑटो पैकी 60 टक्के ऑटो धावतात व नेमके ह्याच मार्गावर मागील दीड वर्षा पासून उड्डाण पुलाची निर्मिती सुरू आहे, चांगले प्रशस्त रोड व सर्व सुविधा युक्त ऑटो स्टँड ह्याची गरज वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक असते परंतु नेमकी हीच सुविधा अकोल्यात नसल्याने वाहतुकीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे, अकोला महानगरपालिका अस्तित्वात येऊन आज 20 वर्षा पेक्षा जास्त कालावधी झाला आहे, परंतु अकोला शहरात अजूनही एवढ्या प्रचंड संख्येने धावणाऱ्या ऑटो साठी एकही अधिकृत ऑटो स्टँड नाही, प्रशस्त रोड नाही, अधिकृत ऑटो स्टँडच नसल्याने व सध्या पोस्ट ऑफिस चौक ते टॉवर चौक दरम्यान उड्डाणपुलावर स्लॅब टाकण्याचे काम सुरू असल्याने रोडवर दोन्ही बाजूला बॅरिकेटिंग करण्यात आले आहे, त्या मुळे वाहतुकीसाठी खूप कमी रोड बाकी राहिला आहे, त्यातच बसस्टँड चे आजूबाजूला शहराचे चारही बाजूला प्रवाश्यांना घेऊन जाणारे ऑटो उभे ठेवावे लागतात, त्यांचे साठी अधिकृत कोणतेही ऑटो स्टँड नसल्याने ते कुठेही उभे राहतात, रोड छोटा झाल्याने वाहतुकीचे नियमन करणाऱ्या वाहतूक पोलिसांना ह्या ऑटो वाल्यांचा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो, परंतु अधिकृत ऑटो स्टँड किंवा उड्डाणपुला मुळे अत्यल्प जागा राहिल्याने आज धिंग्रा चौकात वाहतूक सुरळीत ठेवतांना वाहतूक पोलिसांना सतत हजर राहून प्रचंड मेहनत घ्यावी लागते परंतु वाहतुकीचा खोळंबा झाला की सर्वसामान्य नागरिकांचा रोष सुद्धा वाहतूक पोलिसांनाच सहन करावा लागतो,

ही बाब हेरून शहर वाहतूक पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी जिल्हा रस्ता सुरक्षा समिती मीटिंग मध्ये ऑटो स्टँड चा गंभीर मुद्दा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर व पोलीस अधीक्षक जी श्रीधर ह्यांचे पुढे ठेवला असता त्यांनी एक समिती स्थापन करून ऑटोस्टॅण्ड साठी संपूर्ण शहरात जागा निश्चित करण्याच्या सूचना दिल्या त्या अनुषणगाने आर.टी .ओ., महानगरपालिका, शहर वाहतूक शाखा चे अधिकाऱ्यांनी शहरात सर्वेक्षण करून शहराचे चारही बाजूला प्रमुख चौकात एकूण 20 जागा निश्चित केल्यानंतर पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी पोलीस अधीक्षक जी श्रीधर ह्यांचे मार्फत 9 महिन्या पूर्वी मनपा आयुक्त ह्यांचे कडे प्रस्ताव पाठविल्या नंतर त्यावर विचार सुरू असतानाच नव्याने रुजू झालेल्या मनपा आयुक्त निमा अरोरा ह्यांनी गंभीरता लक्षात घेऊन 2 दिवसा पूर्वी सदर प्रस्तावाला मंजुरी दिली असून लवकरच आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देऊन सदरच्या जागा ऑटो स्टँड साठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, टॉवर चौक ते पोस्ट ऑफिस चौका पर्यंतची उड्डाणपुला खालील संपूर्ण जागा ही ऑटो स्टँड साठी उपलब्ध करून देण्यात आली असून, उड्डाणपुलाचे बांधकाम संपल्या बरोबर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देऊन तेथे सुद्धा लवकरच ऑटोस्टॅण्ड झालेले दिसतील, एकूण एका महिन्यात अकोला शहरातील प्रचंड संख्येने धावणाऱ्या ऑटोना एकदाची थांबण्यासाठी हक्काची जागा उपलब्ध होणार आहे, ह्या मुळे वाहतुकीची समस्या लवकरच सुटेल अशी आशा धरण्यास हरकत नसावी।

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Tags: akola newsAuto stand in akola
Previous Post

धक्कादायक! कोरोनाबाधित मृतदेहाला पीपीई कीटमध्ये बांधण्यासाठी केली जाते पैशाची मागणी

Next Post

कोविड रुग्ण घरीच मृत्यू पावल्यास कुटुंबावरच राहील जबाबदारी… जाणून घ्या काय आहे नवा नियम…

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
कोविड रुग्ण घरीच मृत्यू पावल्यास कुटुंबावरच राहील जबाबदारी… जाणून घ्या काय आहे नवा नियम…

कोविड रुग्ण घरीच मृत्यू पावल्यास कुटुंबावरच राहील जबाबदारी… जाणून घ्या काय आहे नवा नियम…

लॉकडाउन लागू केला तर मोठा उद्रेक,भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदारांचा इशारा

लॉकडाउन लागू केला तर मोठा उद्रेक, भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदारांचा इशारा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.