• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, February 7, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

एनईईटी, जेईई, सिईटी परिक्षा शिकवणी वर्ग तसेच व्यायामशाळा सुरु करण्यास सशर्त परवानगी

Team by Team
March 17, 2021
in Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
82 0
0
बोनस, वेतनवाढ च्या हपत्या करीता वीज कर्मचारी 14 नोव्हेंबर पासून संपावर, तेल्हारा येथे कर्मचारी चे निदर्शने
13
SHARES
589
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला – जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील एनईईटी, जेईई, सिईटी परीक्षा तसेच अन्य स्पर्धा परीक्षांच्या पूर्व तयारीचे शिकवणी वर्ग तसेच व्यायमशाळा सुरु  करण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सशर्त परवानगी देण्याचे आदेश निर्गमित केलेआहे. हे आदेश बुधवार दि. 17 पासून लागू राहतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

यासंदर्भांत आदेशात नमूद केल्याप्रमाणे शहरी व ग्रामीण भागातील एनईईटी, जेईई, सिईटी परीक्षा तसेच अन्य स्पर्धा परीक्षांच्या पूर्व तयारीचे शिकवणी वर्ग तसेच व्यायमशाळा सुरु  करण्यासाठी खालील अटी शर्तीचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

अटी व शर्ती याप्रमाणे –

1) खाजगी कोचिंग क्‍लास, शिकवणी वर्ग, प्रशिक्षण संस्‍था  दि. 16 मार्च 2021 पासून सकाळी नऊ ते

    सायंकाळी पाच या कालावधीतच  सुरु ठेवता येतील.

2) खाजगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्‍लासेस व प्रशिक्षण संस्‍था यांनी त्‍यांचे प्रशिक्षण वर्ग सुरु करतांना प्रत्‍येक बॅचमध्‍ये नियमीत आसन क्षमतेच्‍या 25 टक्के किंवा जास्‍तीत जास्‍त 20 विद्यार्थी राहतील. तसेच दोन बॅचच्‍या मध्‍ये  अर्धा तासाचा अवकाश ठेवून प्रत्‍येक वेळी हॉल व रुमचे तसेच तदनुषांगीक साहीत्‍याचे  निर्जंतुकीकरण करणे बंधनकारक राहील.

3) विद्यार्थ्‍याच्‍या पालकांचे संमती पत्र प्राप्‍त करुन घेणे बंधनकारक राहील.

4) प्रशिक्षण देणाऱ्या आस्‍थापनेतील सर्व संबंधीतांचे तसेच प्रशिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्‍यांचे  कोविड चाचणी करणे अनिवार्य राहील.

5) वर्गखोली तसेच स्टाफ रुम मधील शिक्षक तसेच विद्यार्थी यांनी मास्‍कचा वापर करणे अनिवार्य राहील. त्‍याचप्रमाणे बैठक व्यवस्था शारीरिक अंतर (Physical Distancing) च्या नियमानुसार असावी. शक्‍यतोवर एका बाकावर एक विद्यार्थी या प्रमाणे नावानिशी बैठक व्यवस्था करावी.

6) कोविड-19 चे अनुषंगाने केन्‍द्र व राज्‍य शासन यांनी वेळोवेळी दिलेल्‍या निर्देशांचे तंतोतंत पालन करणे बंधनकारक राहील.

7) या कार्यालयाने वेळोवेळी निर्गमित करण्‍यात आलेल्‍या विविध आदेशांचे  उल्‍लंघन होणार नाही याची संबंधीत संचालकांनी व संस्थेने दक्षता घेण्‍यात यावी.

8) व्‍यायामशाळेमध्‍ये सरावास येणाऱ्या  खेळाडू तसेच कर्मचारी यांची प्रवेशद्वाराजवळ थर्मल स्क्रिनींगद्वारे तपासणी करण्‍यात यावी.  तसेच  सर्व संबंधीतांची  कोविड चाचणी करण्‍यात यावी.

9) सराव करतांना दारे, खिडक्‍या उघडी ठेवण्‍यात यावी तसेच ए.सी. चा वापर टाळण्‍यात यावा.

10) वापरण्‍यात येणा-या साहीत्‍यांचे  वारंवार निर्जंतूकीकरण करण्‍यात यावे.

11) कोविड-19 संदर्भात लक्षणे नसल्‍यास खेळाडूंना प्रवेश देण्‍यता यावा. ताप, सर्दी, खोकला यासारखी लक्षणे असल्‍यास प्रवेश देण्‍यात येवू नये.

12) कोविड-19 चा प्रादुर्भाव फैलाव रोखण्‍यासाठी शासनाने तसेच क्रीडा विभागाकडून निर्गमित केलेल्‍या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहील.

            या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी होण्‍याचे दृष्‍टीने संबंधीत उपविभागाचे  उपविभागीय अधिकारी यांनी  त्‍यांचे अधिनस्‍त पथकाचे  गठण करुन आवश्‍यक ती तपासणी करावी, असे निर्देश देण्यात आले आहे.   

Tags: akola newsoffline classes
Previous Post

अकोला-१६ ग्रामपंचायतींचे आरक्षण निश्चित

Next Post

सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा फायदा, पगारात होणार वाढ

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
नोकरदार वर्गाला मिळणार ‘गुड न्यूज’! आठवड्यात ४८ तास काम केल्यानंतर तीन दिवस सुट्टी देण्याचा पर्याय

सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा फायदा, पगारात होणार वाढ

प्राथमिक शिक्षकाचा संपूर्ण पगार ३६ लाख रूपये, पण छापेमारीत आढळली ५ कोटी रूपयांची संपत्ती

प्राथमिक शिक्षकाचा संपूर्ण पगार ३६ लाख रूपये, पण छापेमारीत आढळली ५ कोटी रूपयांची संपत्ती

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.