अकोला – जिल्ह्यातील १६ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण नव्याने काढण्यात आले. ते याप्रमाणे-
तेल्हारा तालुक्यातील चांगलवाडी- अनुसूचित जाती, सौंदळा- नागरिकांचा मागासप्रवर्ग, वांगरगाव- नागरिकांचा मागासप्रवर्ग स्त्री,
अकोट तालुक्यातील चोहोट्टा-अनुसूचित जमाती, सावरा- नागरिकांचा मागासप्रवर्ग स्त्री, मक्रमपुर- नागरिकांचा मागासप्रवर्ग, मंचनपूर- नागरिकांचा मागासप्रवर्ग स्त्री, पातोंडा अनुसूचित जमाती,
अकोला तालुक्यातील खांबोरा- नागरिकांचा मागासप्रवर्ग स्त्री,
बाळापूर तालुक्यातील अंत्री मलकापूर- नागरिकांचा मागासप्रवर्ग,
बार्शीटाकळी तालुक्यातील लोहगड-अनुसूचित जाती
तर पातुर तालुक्यातील चरणगाव- नागरिकांचा मागासप्रवर्ग स्त्री, दिग्रस खुर्द- नागरिकांचा मागासप्रवर्ग स्त्री, आलेगांव- नागरिकांचा मागासप्रवर्ग, विवरा- नागरिकांचा मागासप्रवर्ग स्त्री, चतारी- अनुसूचित जती स्त्री
या प्रमाणे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी अधिकारी जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत निवडणूक विभाग यांनी कळविले आहे.