अकोला- हवामान विभाग, नागपूर यांच्या संदेशानुसार शनिवार (दि. 20 मार्च) पर्यंतच्या कालावधीत जिल्ह्यामध्ये हल्का ते मध्यम अधिक स्वरुपाचे पर्जन्यमान तसेच एक दोन ठिकाणी विजांचा कडकडाटासह मेघगर्जना होण्याची शक्यता वर्तविलेली आहे.
जिल्ह्यातील गावामधील नागरिकांना आवश्यक ती दक्षता घेण्याचे अनुषंगाने सतर्कतेचा इशारा देण्यात यावा व संबधित अधिकारी, कर्मचारी, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक कृषी सहायक, आरोग्य विभागाचे कर्मचारी यांना आपले मुख्यालयी उपस्थित राहुन योग्य ती दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.