हिवरखेड (धीरज बजाज):- हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ग्राम दानापूर येथे फौजी पतीच्या गैरहजेरीत पत्नी व मुलाला दारुड्याने लोखंडी पाईपने बेदम मारहाण करण्याची संतापजनक घटना घडली आहे.
मागील अनेक वर्षांपासून चिनू विखे हा दारुड्या नेहमी जामोदकार कुटुंबियांना प्रचंड अश्लील शिवीगाळ, विनाकारण भांडने करून नाहक मानसिक त्रास देत होता. म्हणून ह्याआधी सुद्धा त्यांनी बरेचदा हिवरखेड पोलिसांना साकडे घातले होते. परंतु पोलिसांनी त्याचा वेळेवरच बंदोबस्त न केल्याने त्याची हिम्मत वाढत गेली आणि आता असा प्रकार घडला असे सौ. सुनीता शिवदास जामोदकर यांनी सांगितले.
हिवरखेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दानापूर येथील सौ. सुनीता शिवदास जमोदकार ह्या त्यांचे पती शिवदास जामोदकार हे कामानिमित्त तेल्हारा येथे गेले असतांना आपला मुलगा ओम व नक्ष यांच्या समवेत घरी असतांना येथील चिनू विखे हा दारू पिऊन आला व सुनीता जमोदकार यांना अश्लील शिवीगाळ करून लोखंडी पाईप व दगडाने सौ. सुनीता शिवदास जामोदकार व त्यांचा मुलगा ओम ला मारहाण केली.
सुनीता जामोदकार यांच्या पोलिसांना दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी चिनू विखे याच्या विरुद्ध भादवी २९४,३२४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास हिवरखेड पोलीस करीत आहेत.