अकोला : दि. 3 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 2116 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 1772 अहवाल निगेटीव्ह तर 344 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. दरम्यान 276 जणांना डिस्चार्ज देण्यात आला तर दोन रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
त्याच प्रमाणे काल (दि.2) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 87 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 17446(14386+2883+177) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 108905 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 106609 फेरतपासणीचे 376 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 1920 नमुने होते. आजपर्यंत एकूण 108757 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 94371 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
344 पॉझिटिव्ह
आज सकाळी 267 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 90 महिला व 177 पुरुषांचा समावेश आहे. त्यातील, जीएमसी येथील 16, डाबकी रोड व कौलखेड येथील प्रत्येकी 13, मोठी उमरी येथील 12, बार्शीटाकळी येथील 11, दोनद व गोरक्षण रोड येथील प्रत्येकी आठ, कॉग्रेस नगर, जठारपेठ व वडाली देशमुख येथील प्रत्येकी सात, हिंगणा रोड, सिंधी कॅम्प, बार्शीटाकळी येथील प्रत्येकी सहा, आदर्श कॉलनी, राऊतवाडी व मुर्तिजापूर येथील पाच, बाळापूर, सहकार नगर, आळसी प्लॉट, तापडीया नगर व खदान येथील प्रत्येकी चार, खोलेश्वर, लहानउमरी, अकोट,जवाहर नगर, विद्या नगर, गायगाव, न्यु राधाकिसन प्लॉट व गड्डम प्लॉट येथील प्रत्येकी तीन, पिंजर बार्शीटाकळी, राम नगर, संत नगर, सिव्हील लाईन, मलकापूर, यशवंत नगर, गांधी चौक, गिता नगर, कवासा, देवरावबाब चाळ, न्युभागवत प्लॉट, न्यु तापडीया नगर, विठ्ठल नगर, जेतवन नगर व पार्वती नगर येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित मार्डी, कान्हेरी सरप, राहीत बार्शीटाकळी, मुर्तिजापूर, आबेंडकर नगर, गुलजारपुरा, शिव नगर, क्वॉटर, संतोष नगर, किर्ती नगर, गोडबोले प्लॉट, सेन नगर, सस्ती पातूर, ताजनापेठ, मित्रा नगर, श्रावगी प्लॉट, हिंगणा फाटा, विद्युत कॉलनी, मराठा नगर, रजपूतपुरा, नवरंग सोयायटी, भिमनगर, बाळापूर रोड, दुर्गा चौक, हरिहरपेठ, मुकूंद नगर, राधे नगर, राधाकृष्ण टाकीज, पिंपळखुटा, महसूल कॉलनी, गायत्री नगर, इमरॉल्ड कॉलनी, स्टेशन, टाकली खोज, बाळापूर नाका, कृषी नगर, उमरा, रेणूका नगर, देशमुख फैल, आश्रय नगर, तोष्णीवाल लेआऊट, पोलिस हेडक्वॉटर, मलकापूर, दत्ता कॉलनी, शास्त्री नगर, माधव नगर, हनुमान वस्ती, तेल्हारा, जूने शहर, गुडधी, न्यु तापडीया, लखमापूर टाकळी, डोंगरगाव, नयागाव, मालीपुरा, व्हीआयपी कॉलनी, नवीन गोडबोल प्लॉट येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे, तसेच आज सायंकाळी 77 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 32 महिला व 45 पुरुषांचा समावेश आहे. त्यात तळेगाव डवला येथील 13, खंडाळा येथील नऊ, सालतवाडा येथील सहा, देशमुख कॉलनी, मलकापूर, जूने शहर व सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी तीन, तेल्हारा, मुर्तिजापूर, देवळी, वानखडे नगर, महाजनी प्लॉट येथील प्रत्येकी दोन तर उर्वरित इशापूर ता.तेल्हारा, भांबेरी, सवळ, वाडीअदमपूर ता.तेल्हारा, हरि नगर उमरी, आदर्श कॉलनी, व्दारका नगरी, मुर्तिजापूर रोड, देशमुख फैल, शास्त्री नगर, खोलेश्वर, गोकुळ कॉलनी, खिरपूरी, खडकी, सदारपूर, अडगाव, भागीरथ नगर, गंगाधर प्लॉट, सिव्हील लाईन, गोरेगाव, ज्ञानेश्वर नगर, लकडगंज, शिवनगर, हिंगणा फाटा, रामदासपेठ, जयहिंद चौक व शिवाजी नगर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे.
दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन टेस्टच्या अहवालात 87 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी. दरम्यान आज दिवसभरात सकाळी आरटिपीसीआरच्या चाचण्यात 267, सायंकाळी आरटिपीसीआरच्या चाचण्यात 77 तर रॅपिड चाचण्यात 87 असे एकूण 431 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.
276 जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 31, बिहाडे हॉस्पीटल येथील सात, ओझोन हॉस्पीटल येथील सहा, सुर्यचंद्र हॉस्पीटल येथील पाच, आयकॉन हॉस्पीटल येथील एक, हॉटेल रिजेन्सी येथील चार, युनिक हॉस्पीटल येथील दोन, तर होम आयसोलेशन येथील 220 जणांना असे एकूण 276 जणांना डिस्चार्ज देण्यात आला., अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
दोघांचे मृत्यू
दरम्यान आज दोघांचे मृत्यू झाले. त्यात बोरगाव मंजू येथील एका 33 वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला. या महिलेस दि. 27 फेब्रुवारी रोजी दाखल करण्यात आले होते, तर अन्य एकाचा खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला. हा रुग्ण पवन वाटीका, खरप येथील रहिवासी असलेल्या 66 वर्षीय पुरुष रुग्णास दि. 20 फेब्रुवारी रोजी दाखल करण्यात आले होते, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.
3910 जणांवर उपचार सुरु
आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 17446(14386+2883+177) आहे. त्यातील 374 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या 13162 आहे. तर सद्यस्थितीत 3910 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.