अँटिग्वा – विस्फोटक फलंदाज कायरन पोलार्डच्या तुफानी फटकेबाजीचा नजराणा क्रिकेटप्रेमींना काल पुन्हा एकदा पाहायला मिळाला. श्रीलंकेविरुद्ध झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात पोलार्डने जबरदस्त खेळ करताना सहा चेंडूत सहा षटकार ठोकले. त्याबरोबरच त्याने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणाऱ्या युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी केली. पोलार्डच्या या कामगिरीच्या जोरावर पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजने श्रीलंकेला ४१ चेंडू आणि चार विकेट्स राखत पराभूत केले.
या लढतीमध्ये श्रीलंकेने दिलेल्या १३२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचे चार फलंदाज झटपट माघाती परतले होते. अशा परिस्थितीत कायरन पोलार्डने अखिला धनंजयने (Akila Dananjaya) टाकलेल्या सहाव्या षटकात विस्फोटक फलंदाजी करत सलग सहा चेंडूत सहा षटकार ठोकले. त्यामुळे वेस्ट इंडिजचा संघ विजयासमिप पोहोचला.
*6 Sixes in an Over in International Cricket*😱😱😱
✅Yuvraj Singh v England 2007
✅ Herschelle Gibbs v Netherlands 2017
✅ Kieron Pollard v Sri Lanka TODAY!! 💥💥💥💥💥💥 pic.twitter.com/NY2zgucDXB— Windies Cricket (@windiescricket) March 4, 2021
यापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केवळ दोनवेळाच सहा चेंडूत सलग सहा षटकार ठोकण्याची किमया फलंदाजांना करता आली आहे. त्यात २००७ च्या क्रिकेट विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेच्या हर्शल गिब्जने सहा चेंडूत सहा षटकार ठोकले होते. त्यानंतर त्याचवर्षी झालेल्या टी-२० विश्वचषकात भारताच्या युवराज सिंगने इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडच्या गोलंदाजीवर सलग सहा षटकार ठोकले होते. आता तब्बल १४ वर्षांनंतर पोलार्डने या विक्रमाशी बरोबरी साधली आहे.
या लढतीत १३२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचे चार फलंदाज झटपट बाद झाले होते. लँडल सिमन्स (२६), एव्हिन लुईस (२८), ख्रिस गेल (०) आणि निकोलस पूरन (०) हे माघारी परतले असताना पोलार्डने मैदानात येताच एकदम टॉप गिअर टाकला आणि अखिला धनंजयच्या गोलंदाजीच्या चिंधड्या उडवल्या. ११ चेंडूत ३८ धावांची तुफानी खेळी करणाऱ्या पोलार्डला समानावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले.