अकोला : शहरात जर दहशतवाजी शिरले…बस हायजॅक झाली…शाळेत व गर्दीच्या ठिकाणी शिरून नागरिकांना वेठीस धरले तर पोलिस ही परिस्थिती कशी हाताळतील… हे सोमवारी (ता.१) नागरिकांना बस स्थानक परिसरात बघावयास मिळाले.
दहशतवाद विरोधी कक्षाकडून शहरात दहशतवादी हल्ला झाल्यास परिस्थिती कशी हाताळयची याबाबतचे प्रात्याक्षिक पथकाने बस स्थानक परिसरात दुपारी केले. एकाकी करण्यात आलेल्या मॉक डिलची माहिती बस स्थानकात उपस्थित प्रवाशांना होण्यापूर्वी त्यांचा चांगलाच थरकाप उडाला होता. मुंबई येथील प्रसिध्द उद्योगपती मुकेश अंबानी यांचे घरापुढे ठेवण्यात आलेल्या कारमध्ये जिलेटिन स्फोटके आढळून आली होती. त्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही परिस्थिती हाताळण्याच्या उद्देशाने ही मॉक डील करण्यात आली होती.
अशी झाली सुरुवात
सोमवारी सकाळी १०.५० वाजतापासुन ११.३० वाजेपर्यंत ही मॉक डिल करण्यात आली. नवीन बस स्थानक येथील बस क्रमांक एमएच-४०-वाय-५७४३ ही दहशतवाद्यांनी ताब्यात घेतल्याचा बनाव करून प्रात्याक्षिक करण्यात आले. दहशतवाद्यांनी ताब्यात घेतलेल्या बस मधिल दहशवाद्यांना न्युट्रलाईज करून त्यामधिल प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्याचा तसेच दहशतवाद्यांकडे असलेल्या स्फोटकांची बॅक, पथकाजवळील उपकरण तसेच श्वान ब्राव्हो यांचे माध्यमातून तपासणी करून त्याचे जवळ मिळून आलेले स्फोटक न्यूट्रलाईज करण्यात आली. त्याच प्रमाणे बसमध्ये मिळून आलेल्या दहशतवाद्यांना आरसीपीच्या कंमान्डोजच्या माध्यामातून ताब्यात घेण्यात आली. हा एखादा खराखुरा दहशतवादी हल्ला असावा असा बनाव यावेळी करण्यात आला होता.
जनजागृतीचा उद्देश
दहशतवादी कृत्यांच्या घटनांबाबत जनसामान्यांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने पोलिस अधीक्षक जी.श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षका मोनिका राऊत, उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल ठाकुर यांचे मार्गदर्शनाखाली व प्रत्यक्ष उपस्थितीत दहशतवाद विरोधी कक्षाने (एटीसी) अकोलाचे प्रभारी पोलिस निरीक्षक विलास पाटील व त्यांचे पथकातील पोलिस अंमलदार, बॉम्ब शोधक व नाशक पथकाने बस स्थानक परिसरात मॉक डिल केली. अकोला येथील पोलिस अधिकारी पो.उपनिरीक्षक मडावी व त्यांचा स्टॉफ तसेच त्यांचा श्वान ब्राव्होही या कारवाईत सहभागी झाले होते. पोलिस मुख्यालय, अकोला येथील राखीव पोलिस निरीक्षक गुलसुंदरे, आसीपी व क्युआरटीचे पथक, सिव्हिल लाईन्स, रामदास पेठ,सिटी कोतवाली येथील पोलिस अधिकारी व त्यांचे अंमलदार यांचे समन्वयाने ही मॉक डिल करण्यात आली.