तेल्हारा (प्रतिनिधी)- संत गाडगेबाबा जयंती पूर्वी, संत गाडगेबाबा सभागृहाची दुरुस्ती करून सभागृहाला संत गाडगेबाबा सभागृह असे नाम फलक लावण्यात यावे अशी मागणी तेल्हारा विकास मंच च्या माध्यमातून पालिका अध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे .
स्थानिक सुपिनाथ नगर ,तापडिया गार्डनमध्ये ज्या भव्य सभागृहाची निर्मिती नगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात आली आहे अश्या संत गाडगेबाबा सामाजिक सभागृहाची स्वच्छता व दुरुस्ती करून संत गाडगेबाबा जयंती पूर्वी सदर सभागृहावर संत गाडगेबाबा सभागृह असे नाम फलक लावण्यात यावे व सदर सभागृह जनतेच्या सेवत रुजू करा अशी मागणी तेल्हारा विकास मंचच्या माध्यमातून नगरपालिका अध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन करण्यात आली आहे . निवेदनावर विकास मंचचे अध्यक्ष रामभाऊ फाटकर मोहन श्रीवास , राजू देशमुख , गणेश मोकळकर नितिन मानकर ,स्वप्निल सुरे इत्यादींच्या स्वाक्षर्या आहेत