• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, June 8, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

कोरोना संसर्गाचा फैलाव रोखणे ही प्रत्येकाची जबाबदारी-राज्य कोविड टास्क फोर्स प्रतिनिधी डॉ. सुभाष सोळुंखे

Team by Team
February 19, 2021
in Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
78 1
0
कोरोना संसर्गाचा फैलाव रोखणे ही प्रत्येकाची जबाबदारी-राज्य कोविड टास्क फोर्स प्रतिनिधी डॉ. सुभाष सोळुंखे
21
SHARES
566
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला –जिल्ह्यात होत असलेली कोरोना रुग्णसंख्येतील वाढ व रुग्ण संख्या वाढीचा दर ही चिंतेची बाब आहे. कोरोना संसर्गाचा हा फैलाव रोखणे ही  प्रशासकीय यंत्रणेसोबतच लोकप्रतिनिधी व लोकांची अशी प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्यादृष्टीने सर्व घटकांनी खबरदारी घ्यावी,असे निर्देश राज्य कोविड टास्क फोर्सचे प्रतिनिधी डॉ. सुभाष सोळुंखे यांनी दिले.

राज्य कोविड टास्क फोर्सचे प्रतिनिधी डॉ. सुभाष सोळुंखे यांनी आज जिल्हा प्रशासनातर्फे कोरोनाचा वाढलेला फैलाव रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. जिल्हा नियोजन भवनात पार पडलेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर,मनपा आयुक्त निमा अरोरा, पोलीस अधिक्षक जी. श्रीधर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी मुकेश चव्हाण, प्रांताधिकारी डॉ. निलेश अपार, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. फारुख शेख तसेच विविध यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

यावेळी डॉ. सोळुंखे यांनी जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. त्याबद्दल जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली व जिल्ह्यातील कोरोना फैलावाच्या सद्यस्थितीबाबत अवगत केले.

त्यात माहिती देण्यात आली की, जिल्ह्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना कडक करण्यात आल्या असून त्यासाठी विविध आदेश निर्गमित करण्यात आले आहे. गर्दी होणारी संभाव्य ठिकाणांवर गर्दी होऊ नये यासाठी उपाययोजना. विवाह समारंभ अन्य समारंभांबाबत दिशा निर्देश जारी करुन त्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई  करण्यात येत आहेत. मास्क न घालणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. ग्रामिण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर दररोज एक हजार जणांच्या चाचण्या करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक रविवारी संपूर्ण संचारबंदी तसेच रात्रीची संचारबंदी आदी उपाययोजना करण्यात आले असल्याची  माहिती देण्यात आली.

आपल्या संबोधनात डॉ. सोळुंखे म्हणाले की, कोरोनाचा हा फैलाव रोखण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहेच. तथापि प्रशासनाने घालुन दिलेल्या निर्बंधांचे पालन करणे हे लोकांचे कर्तव्य आहे. ही एकट्या प्रशासनाची जबाबदारी नसून लोक व लोकप्रतिनिधी यांचीही जबाबदारी आहे. ते पुढे म्हणाले की, जर येत्या आठ दिवसात वाढत्या संसर्गाला अटकाव करता आला नाही तर  संपुर्ण लॉकडाऊनचा पर्याय अवलंबावा लागेल. होम आयसोलेशन मध्ये असलेले रुग्ण बाहेर दिसले तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा. प्रत्येक खाजगी डॉक्टरांनी त्यांच्याकडील तापाच्या रुग्णांची  माहिती  प्रशासनाकडे देणे बंधनकारक असून त्यांनीही याबाबत दक्षता घ्यावी असे डॉ. सोळुंखे यांनी सांगितले.

Tags: corona meeting akolacorona task force
Previous Post

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी दर रविवारी संपूर्ण तर रात्रीही संचारबंदी – जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आदेश

Next Post

Game of Thrones spending just as long making fewer episodes

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post

Game of Thrones spending just as long making fewer episodes

नागपूर खंडपीठाच्या न्यायाधीशांना का बरं महिलेने पाठवले तब्बल दीडशे कंडोमची पाकिटे ?

नागपूर खंडपीठाच्या न्यायाधीशांना का बरं महिलेने पाठवले तब्बल दीडशे कंडोमची पाकिटे ?

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.