तेल्हारा(प्रतिनिधी)– कोरोनाने जिल्हयात पुन्हा हाहाकार माजविला असून रुग्णांची संख्या ही दरोरोज वाढती असल्याने जिल्हा प्रशासनाने कारवाईचे आदेश दिले आहे अशातच आज शहरात नगर पालिका प्रशासन व पोलीस प्रशासनाकडून विना मास्क फिरणाऱ्या १२ जणांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.यावेळी कोरोनाचा प्रभाव टाळण्यासाठी नागरिकांनी मास्कचा वापर करावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.