• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, February 28, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एका महिलेला फाशी…

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
February 18, 2021
in Featured, गुन्हा, राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
85 0
0
स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एका महिलेला फाशी...
18
SHARES
610
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एका महिलेला फाशी दिली जाणार आहे. उत्तर प्रदेशमधील मथुरा येथील तुरुंगामध्ये मूळची अमरोहा येथे असणाऱ्या शबनमला फासावर लटकवण्यात येणार आहे. शबनमला फाशी देण्यासंदर्भातील तयारी तुरुंग प्रशासनाने सुरु केली आहे. निर्भया प्रकरणातील आरोपींना फाशी देणाऱ्या मेरठच्या पवन जल्लादनेही या तुरुंगामधील फाशीघराची दोन वेळ पहाणी केली आहे. फाशीची तारीख निश्चित करण्यात आलेली नसली तरी तुरुंग प्रशासनाच्या तयारी सुरु केल्याचे चित्र दिसत आहे.

अमरोहामध्ये राहणाऱ्या शबनमने २००८ साली प्रियकर सलीमच्या मदतीने स्वत:च्या सात नातेवाईकांवर कुऱ्हाडीने हल्ला करुन त्यांची हत्या केली होती. या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने शबनमला सुनावण्यात आलेली फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे. राष्ट्रपतींनीही शबनमचा दयेचा अर्ज स्वीकारलेला नाही. त्यामुळेच आता तुरुंग प्रशासनाने शबनमला फाशी देण्याची तयारी सुरु केलीय.

नक्की काय घडलं त्या रात्री?                                                                                                                          अमरोहामधील हसनपूरजवळ असणाऱ्या बावनखेडी गावात राहणाऱ्या शबनमने सलीमच्या मदतीने २००८ साली १४ आणि १५ एप्रिलच्या मध्यरात्री आपल्या घरातील सात जणांची हत्या केली. यामध्ये शबनमचे वडील मास्टर शौकत, आई हाश्मी, भाऊ अनीस आणि रशीद, वहिनी अंजूम आणि तिची बहीण रबीया या सहा जणांना समावेश होता. शबनमने नंतर आपल्या लहान भाचालाही गळा आवळून मारुन टाकलं. सलीमसोबत असणाऱ्या आपल्या प्रेमाला कुटुंबाचा विरोध असल्याने शबनमने संपूर्ण कुटुंबाची हत्या केली.

तब्बल १०० दिवस सुनावणी आणि ६४९ प्रश्न                                                                                                                      अमरोह येथील न्यायालयामध्ये या प्रकरणाची सुनावणी दोन वर्ष तीन महिने चालली. त्यानंतर १५ जुलै २०१० रोजी जिल्हा न्यायालयातील न्यामूर्ती एस. ए. ए. हुसैनी यांनी शबनम आणि सलीमला फाशीची शिक्षा सुनावली. शबनम आणि सलीम प्रकरणासंदर्भात तब्बल १०० दिवस न्यायालयामध्ये सुनावणी झाली. यादरम्यान न्यायालयाने २९ साक्षीदारांचे म्हणणे ऐकून घेतले. १४ तारखेला साक्षीदार आणि पुरावे सादर करुन झाल्यानंतर पुढच्या दिवशीच अवघ्या २९ सेकंदांमध्ये न्यायालयाने दोघांनाही फाशीची शिक्षा सुनावली. या प्रकरणामधील सुनावणीदरम्यान एकूण २९ जणांनी ६४९ प्रश्न विचारले. १६० पानांचा निकाल न्यायालयाने दिला होता.

लगेच तिला फासावर चढवण्यात येईल                                                                                                                               मथुरामधील तुरुंगामध्ये १५० वर्षांपूर्वी महिलांना फाशी देण्यासाठी हे विशेष फाशीघर तयार करण्यात आलं. मात्र भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून कोणत्याही महिलेला फाशी देण्यात आलेली नाही. तुरुंग प्रशासनातील वरिष्ठ अधीक्षक असणाऱ्या शैलेंद्र कुमार मैत्रेय यांनी दिलेल्या माहितीनुसार फाशी कधी देण्यात येणार हे अद्याप ठरलेलं नाही. मात्र तुरुंग प्रशासनाने त्यांच्या बाजूने संपूर्ण तयारी करुन ठेवली आहे. डेथ वॉरंट जारी झाल्यानंतर शबनमला लगेच फासावर चढवण्यात येईल असं मैत्रेय यांनी सांगितलं आहे.

दुरुस्ती आणि रस्सी…                                                                                                                                                तुरुंग अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार पवन जल्लादनेही दोन वेळा फाशीघर पाहिलं आहे. पवन जल्लादने फाशी देण्यात येणाऱ्या ठिकाणी असणारा खटका आणि काही गोष्टींमध्ये दोष असल्याचं निरिक्षण नोंदवल्यानंतर त्यासंदर्भातील डागडुजी केली जात आहे. बिहारमधील बक्सरमधून शबनमला फाशी देण्यासाठी वापरण्यात येणारी रस्सी मागवण्यात येणार आहे.

Tags: crime newsfirst woman to be hangedShabnam
Previous Post

अकोला : प्रधानमंत्री श्रमयोगी व राष्ट्रीय निवृत्ती योजना अंमलबजावणी समितीची बैठक योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

Next Post

बाळाला पदार्थांची ओळख करून देताना…

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
बाळाला पदार्थांची ओळख करून देताना…

बाळाला पदार्थांची ओळख करून देताना...

तेल्हाऱ्यात विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई,१२ जणांविरुद्ध दंडात्मक कारवाई

तेल्हाऱ्यात विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई,१२ जणांविरुद्ध दंडात्मक कारवाई

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.