• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, February 1, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ कर्ज व्याज परतावा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

Team by Team
September 25, 2021
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, महाराष्ट्र, योजना, राज्य
Reading Time: 1 min read
98 1
0
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ कर्ज व्याज परतावा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
20
SHARES
705
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला – अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कर्ज योजना बेरोजगार उमेदवारांसाठी उपलब्ध असून गरजू उमेदवारांना स्वत:चा व्यवसाय सुरु करण्यासाठी महामंडळाकडून व्याजाचा परतावा या योजनेंतर्गत अर्थसहाय्य दिले जाते. बेरोजगार उमेदवारांनी  www.udyog.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर केल्यानंतर LOI (Letter of Intent) जनरेट होतो. बॅंकेने संबंधित उमेदवाराचे कर्ज प्रस्तावाला मान्यता दिल्यास महामंडळातर्फे व्याजाची रक्कम उमेदवारांच्या बचत खात्यात परत करण्यात येते. महामंडळाची ही योजना मराठा तसेच ज्या प्रवर्गासाठी स्वतंत्र महामंडळ अस्तित्वात नाही त्या प्रवर्गांसाठीच आहे. यासाठी संपूर्ण यंत्रणा ऑनलाईन आणि पूर्णपणे पारदर्शक आहे. या योजनेचा फायदा थेट लाभार्थ्यांना देण्यात येतो. ही योजना लोकाभिमुख असून लाभार्थी जोपर्यंत सर्व माहिती वेब प्रणालीवर अपलोड करीत नाही, तोपर्यंत व्याज परताव्याची पुढील कार्यवाही करता येत नाही.

लाभ घेण्याची कार्यपद्धती

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

       लाभार्थ्यांनी  ऑनलाईन माहिती भरताना पात्रता प्रमाणपत्रासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे आधार कार्ड (अपडेटेड मोबाईल क्रमांक व स्वत:च्या ई-मेल आयडीसह), रहिवासी पुरावा(रहिवासी दाखला, लाईट बिल, रेशनकार्ड, गॅस बिल किंवा बँक पास बुक यापैकी कोणताही एक पुरावा), उत्पन्नाचा पुरावा (तहसीलदार ह्यांचा उत्पन्नाचा दाखला, आयटी रिटर्न, जर लग्न झाले असल्यास पती-पत्नीचे व लग्न झाले नसल्यास स्वत:चे आयटी रिटर्न अनिवार्य), जातीचा दाखला‍ किंवा शाळा सोडल्याचा दाखला, पोर्टलवरील एकपानी प्रकल्प अहवाल अशी  कागदपत्रे आवश्यक राहील.

            लाभार्थ्यांनी ऑनलाईन माहिती भरल्यानंतर उमेदवाराला व्याज परतावा प्रमाणपत्र प्राप्त होईल. त्यानंतर कर्ज प्रकरणासोबत प्रमाणपत्र बँकेला स्वत: जावून सादर करावे व त्याची पोच घ्यावी. बँक मंजुरीनंतर उमेदवाराने स्वत: वेब प्रणालीत माहिती अद्ययावत केली आहे काय, याची खात्री करावी. मंजुरीनंतर बँकेने आवश्यक कागदपत्रे लाभार्थ्याला द्यावीत. बँकेमध्ये पूर्ण हप्ता भरल्यानंतर महामंडळाच्या वेब प्रणालीवर ऑनलाईन क्लेम करावा. पडताळणी केल्यानंतर महामंडळामार्फत व्याज परतावा करण्यात येईल.

           लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे  सहाय्यक आयुक्त प्रांजली यो. बारस्कर व कौशल्य विकास व रोजगार उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी  सुधाकर झळके यांनी केले आहे. योजनेविषयी इतर माहितीकरिता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, प्रशासकीय इमारत, दुसरा माळा येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.

Tags: Annasaheb Patil Financial Backward Development Corporationअण्णासाहेब पाटील आर्थिक विकास
Previous Post

घरगुती वादानंतर पतीने पत्नीच्या डोक्यात डंबल्स घालून हत्या केली, दिवसभर मुले मृतदेहाजवळ बसून होती

Next Post

कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचे स्वरुप व जबाबदारीबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
corona

कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचे स्वरुप व जबाबदारीबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

shivaji-maharaj

छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्याबाबत मार्गदर्शक सूचना

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.