अकोला(प्रतिनिधी)- अकोला पंतप्रधान यांच्या द्वेषाने आज सर्व राजकीय पक्ष भाजप विरुद्ध एकत्र येत असून, तसेच वेगवेगळे घटक वेगवेगळ्या विषयावर देशांमध्ये अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. Covid-19 या संकटातून बाहेर येऊन आर्थिक नाडी हळूहळू येत असताना देशाला आर्थिक संकटातून नेण्याचा प्रयत्न करीत असले तरी भारतातील देशभक्त नागरिक आत्मनिर्माण भारत निर्माण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी असून भाजप कार्यकर्त्यांनी समाजात जनसंपर्काच्या माध्यमातून भाजप विरोधकांचा प्रयत्न म्हणून पाठवून राज्यातील आघाडी सरकारच्या विरोधात संघर्षासाठी सज्ज व्हावे. असे आव्हान भाजपा प्रदेश उपाध्यक्ष व माजी मंत्री आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी केले.
आज भारतीय जनता पार्टी कार्यालयात ग्रामपंचायत निवडणूक सध्याची राजकीय परिस्थिती तसेच 15 जानेवारीपासून राम जन्मभूमी न्यास च्या माध्यमातून घरोघरी समर्पण निधी संकलन कार्यक्रमाचा आढावा घेण्याच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी महानगराध्यक्ष विजय अग्रवाल हे होते यावेळी प्रदेश कार्यकारणी सदस्य तेजराव थोरात माधव मानकर रमेश अप्पा खोपरे केशव ताथोड संजय गोडा संजय जिरापुरे प्रामुख्याने मंचावर विराजमान होते.
यावेळी माधव मानकर यांनी अकोला जिल्हा भाजपा ग्रामीण तर्फे ग्रामपंचायत निवडणूक तसेच आगामी कार्यक्रमकेंद्रीय राज्यमंत्री संजय भाऊ धोत्रे अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर आमदार गोवर्धन शर्मा आमदार हरीश पिंपळे आमदार प्रकाश भारसाकळे तेजराव थोरात व तालुका अध्यक्ष यांच्या नेतृत्वात होणाऱ्या कार्यक्रमाची माहिती त्यांनी दिली, तर महानगराची माहिती संजय जिरापुरे यांनी दिली .तसेच यावेळी भाजपा संघटना व राजकीय परिस्थिती यावर तसेच विविध विषयावर डॉक्टर संजय कुटे यांनी मार्गदर्शन केले .कार्यक्रमाचे संचालन रमेश आप्पा खोबरे तर प्रास्ताविक विजय अग्रवाल तर आभार प्रदर्शन संजय गोडा यांनी केले.यावेळी तालुकाध्यक्ष सरचिटणीस विविध आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.