• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, March 24, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

व्याळा ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम रद्द: सुधारीत प्रभाग रचना करण्याचे निवडणूक आयोगाचे निर्देश

Team by Team
December 28, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
78 1
0
व्याळा ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम रद्द: सुधारीत प्रभाग रचना करण्याचे निवडणूक आयोगाचे निर्देश
12
SHARES
563
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला – मा. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, व्याळा ता. बाळापूर या ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम रद्द करण्यात आला असून या ग्रामपंचायतीचा सुधारीत कार्यक्रम नंतर जाहीर करण्यात येणार असून राज्य निवडणूक आयोगाने या ग्रामपंचायतीची प्रभाग रचना सुधारीत करण्याबाबत निर्देश दिले आहेत. प्रभाग रचनेचा कार्यक्रमही निवडणूक आयोगामार्फत देण्यात येणार आहे. या निर्देशांनुसार अंमलबजावणीचे आदेश जिल्हाधिकारी अकोला यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार बाळापूर यांना दिले आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनातर्फे निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली आहे.

यासंदर्भात जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त माहितीनुसार, मा.राज्‍य निवडणुक आयोगाच्या दिनांक २९ नोव्हेंबर २०१९ च्‍या आदेशान्‍वये माहे जुलै २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्‍या सार्वत्रिक निवडणुकीकरिता प्रभाग रचना व आरक्षणाचा कार्यक्रम दिला होता. कोविड-१९ च्‍या पार्श्‍वभुमीवर दि. १७ मार्च २०२० च्‍या आदेशान्‍वये हा कार्यक्रम स्‍थगित करण्‍यात आला होता. त्‍यानंतर आयोगाने दि.२०ऑक्टोबर २०२० रोजी सुधारित प्रभाग रचना व आरक्षण कार्यक्रम दिला. त्‍यानुसार अकोला जिल्ह्यातील व्‍याळा ता.बाळापुर जि.अकोला या ग्रामपंचायतीच्‍या प्रभाग रचना व आरक्षणाचा कार्यक्रम राबविण्‍यात येवुन दि. २ नोव्हेंबर २०२० रोजी अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध केली. त्यानंतर मतदार यादीच्या कार्यक्रमानुसार अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्‍यात आली.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तथापि, लोकसंख्‍येच्‍या प्रमाणात प्रभागाची व लोकसंख्‍येची विभागणी आणि आरक्षणाची विभागणी करावयास पाहिजे होती. परंतु त्‍या पद्धतीची झालेली दिसत नसल्‍याबाबत उत्‍तम गोविंदराव म्‍हैसने, मु.पो. व्‍याळा ता.बाळापूर जि. अकोला यांनी मा. उच्‍च न्‍यायालय मुंबई खंडपीठ नागपूर येथे रिट याचीका क्रमांक ३५३६/२०२० दाखल केली होती. या याचिकेच्या सुनावणीनंतर दि. १८ डिसेंबर २०२० रोजी आदेश पारीत करण्‍यात आला असून त्यात अर्जदार यांनी सक्षम अधिकारी यांच्‍याकडे अर्ज सादर करावे असे आदेशित केले होते. त्‍यानुसार अर्जदार यांनी राज्य निवडणूक आयोग व जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात अर्ज सादर केला.

यासंदर्भात मा. उच्‍च न्‍यायालयाचे आदेशानुसार मा.राज्‍य निवडणुक आयोगास सविस्‍तर अहवाल सादर करुन मार्गदर्शन मा‍गविले असता, त्यांनी, व्‍याळा ग्रामपंचायतीची प्रभाग रचना सदोष असुन ती रद्द करणे आवश्‍यक असल्‍यामुळे अशा प्रभाग रचनेवर निवडणुक घेतल्‍यास ती लोकहिताच्‍या दृष्‍टीने अयोग्‍य असेल म्‍हणुन मा. आयोगाने गुरुवार दि.२४ डिसेंबर २०२० रोजीच्या आदेशान्‍वये व्‍याळा ग्रामपंचायतीच्‍या निवडणुकीचे आतापर्यंत पार पाडण्‍यात आलेले सर्व टप्‍पे रद्द करुन नियमानुसार नव्‍याने प्रभाग रचना करण्‍याबाबत निर्देश दिले आहेत.

त्‍यानुसार व्‍याळा ग्रामपंचायतीची महाराष्‍ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्‍या कलम १० मधील तरतुदीनुसार नव्‍याने प्रभाग रचना करण्‍याकरिता मा.आयोगाकडुन स्‍वतंत्रपणे कार्यक्रम देण्‍यात येईल. त्‍यामुळे मा. राज्‍य निवडणुक आयोगाचे दि. ११ डिसेंबर २०२० रोजीचे निवडणुक कार्यक्रमानुसार पार पडणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांसोबत व्‍याळा ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणुक होणार नसुन या निवडणुकीचा कार्यक्रम मा.आयोगाकडुन स्‍वतंत्रपणे निर्गमित करण्‍यात येईल. त्‍याअनुषंगाने मा.राज्‍य निवडणुक आयोगाने दिलेल्‍या निर्देशानुसार पुढील कार्यवाही करण्‍याबाबत जिल्‍हाधिकारी अकोला यांनी तहसिलदार तथा निवडणुक अधिकारी बाळापुर यांना निर्देश दिले आहेत.

Tags: ग्रामपंचायत निवडणूक
Previous Post

धुळघाट रेल्वे चा पूल पाडला,ऐतिहासिक धरोहर अखेर नामशेष

Next Post

दुग्ध व्यवसाय एक कंपनी म्हणून चालवावा – शांताराम गायकवाड

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
दुग्ध व्यवसाय एक कंपनी म्हणून चालवावा – शांताराम गायकवाड

दुग्ध व्यवसाय एक कंपनी म्हणून चालवावा - शांताराम गायकवाड

बोनस, वेतनवाढ च्या हपत्या करीता वीज कर्मचारी 14 नोव्हेंबर पासून संपावर, तेल्हारा येथे कर्मचारी चे निदर्शने

स्व.डॅडी देशमुख जयंती समारोह व पुरस्कार वितरण सोहळा; ज्येष्ठ रंगकर्मी अरुण घाटोळ सन्मानित

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.