अकोट(देवानंद खिरकर)– आमरण उपोषणाच्या चौथ्या दिवसाला सरकारचे दुर्लक्ष असल्यामुळे सर्व वारकरी मंडळींनी काळ्या फीती लाऊन ऊपोषन केले असून गणेश महाराज शेटे यांची प्रकृती खालावली डॉक्टरांनी दवाखान्यात भारतीय करायला सांगितले असता दवाखान्यात न जान्याचा शेटे महाराजांचा निर्धार ही माहीती महादेव महाराज निमकंडे यांच्या माध्यमातून देन्यात आली असून अद्याप कोणताही निर्णय लागलेला नाही आमदार अमोल दादा मिटकरी व राष्ट्रवादी अकोला जिल्हाध्यक्ष संग्राम भैय्या गावंडे यांनी भेट दिली असता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व अमोल दादा मिटकरी यांची मोबाईलद्वारे चर्चा झाली व आमदार अमोल दादा मिटकरी यांच्यामार्फत जयंत पाटील व शेटे महाराज यांच्याशी फोनवर चर्चा करण्यात आली पण सध्या लेखी स्वरूपात परवानगी देऊ शकत नाही आठ दिवसानंतर मुख्यमंत्री साहेबांची चर्चा करून सांगतो हे आश्वासन देण्यात आले पण लेखी स्वरूपात आश्वासन असल्या शिवाय आमरण उपोषण मागे घेणार नाही अशी शेटे महाराजांनी माहिती दिलेली आहे आमरण उपोषणाला भेट देण्याकरिता महाराष्ट्रातील थोर संत मंडळी येत असल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पंढरपूरचे स्वरूप आले आहे व उपोषणाला भेट देण्या साठी येत असणाऱ्या भाविकांची भोजनाची व्यवस्था अकोल्यातील भाविक मंडळी अतिशय उत्साहाने व आवडीने करीत आहे ऊपोषणाचे पडसाद पूर्ण महाराष्ट्रभर ऊमटत आहेत ईश्वरी सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्रातील तहसील कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवेदन देण्यात आलेले आहेत व वारकऱ्यांना त्वरित न्याय न मिळाल्यास येत्या सात तारखेला सरकार वारकऱ्यांची दखल घेत नाही सरकार आमच्याकरिता मेल असं समजून विश्व वारकरी सेनेचे सर्व पदाधिकारी आपापल्या ठिकाणावर जाहीरपणे सरकारच्या नावाने पिंड पळून तेरी चा कार्यक्रम करतील अशी माहिती अध्यक्ष करून महाराज यांनी दिलेली आहे.
आज आमरण उपोषणाला उपस्थित संत मंडळी महादेव महाराज निमकंडे , विठ्ठल महाराज साबळे, राजू महाराज कोकाटे,मोहन महाराज गोंडचोर, गजानन महाराज ऐरोकार,प्रविण महाराज कुलट, निखिल महाराज गोबरे, गोपाल महाराज नारे, ज्ञानेश्वर महाराज पातोंड, ज्ञानेश्वर महाराज सोळंके, श्रीकृष्ण महाराज बाबुळकर, विजय महाराज राऊत ,पुरुषोत्तम महाराज मोरे, विक्रम महाराज शेटे, सोपान महाराज ऊकर्डे, गजानन भाऊ मोडक, सचिन पाकने ,ज्ञानु भाऊ वसतकार, मोहन भाऊ खापरे, साहेबराव काळे ,विनोद महाराज पवार,श्रीधर महाराज ताळोकार, प्रसाद महाराज कुलट,शिवशंकर महाराज इंगळे गजानन माऊली हागे, किशोर महाराज वानखडे , डॉ सौ कल्याणी ताई पदमने, सौ वर्षा ताई गावंडे,सौ शिला ताई दिक्षीत,सौ वनमाला ताई शिवनाद आदि संद मंडळीची उपस्थिती लाभली.