नवी दिल्ली : फेसबुकने एक नवे फिचर लॉन्च करून युजर्सना खुशखबर दिली आहे. फेसबुक मेसेंजर आणि इन्स्टाग्राम युजर्ससाठी एक खास फिचर आणले आहे. अमेरिकेसह इतर बाजारामध्ये शुक्रवारपासून इन्स्पायर फ्रॉम स्नॅपचॅट वरुन हे फिचर आणले जात आहे. या नविन फिचरचे नाव Vanish Mode (व्हॅनिश मोड) असे आहे.
द व्हर्जच्या रिपार्टनुसार, जागतिक स्तरावर निवडलेल्या युजर्ससाठी फेसबुकने एक नवीन व्हॅनिश मोड आणले आहे. हे फिचर भारतातील युजर्ससाठी उपलब्ध असेल की नाही याची फेसबुकने अध्याप पुष्टी केलेली नाही. व्हॅनिश मोड या फिचरच्या मदतीने युजर्सने पाठवलेला मजकूर, फोटो आणि व्हॉइस मेसेजेस पाहिल्यानंतर गायब होऊ शकतील. किंवा चॅट बॉक्स बंद केल्यावर ते दिसणार नाहीत. व्हॅनिश मोड फक्त फेसबुकवरील वैयक्तिक चॅटवर कार्य करणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. तर हे फिचर ग्रुप चॅटवर काम करणार नाही.
युजर्सना नवीन व्हॅनिश मोड डाऊनलोड करण्यासाठी पहिल्यांदा मोबाईलच्या सेटिंग्ज मेनूवर जावे लागेल. तेथून आपल्याला नवीन ऑप्शन मिळणार आहे. याशिवाय युजर्सना हा ऑप्शन डिसेबल करता येणार आहे. फेसबुकने आधीच सिक्रेट संभाषण फीचर ऑफर केले आहे. यांच्या मदतीने युजर एंड-टू-एंड एनक्रिप्टेड चॅट करू शकतात. याचा अर्थ असा की, सीक्रेट गप्पा दरम्यान पाठविलेल्या फायली फेसबुक सर्व्हरऐवजी वापरकर्त्यांच्या फोनमध्ये संग्रहित केल्या जातात.
याआधी ही फेसबुकचे असेच डिसअपियरिंग मेसेजेस’ गेल्या आठवड्यात व्हॉट्सअपवरही आणले होते. त्या ॲपमध्ये ही एकदा पाठविलेले संदेश सात दिवसानंतर आपोआप डिलीट होत होते. हे ॲप iOS आणि Android या दोही फोनमध्ये उपलब्ध होणार आहे.