तेल्हारा : तेल्हारा तालुक्यातील अतिशय महत्वाची समजली जाणारी ग्रामपंचायत दापुरा यांचे विरुद्ध दापुरा ग्रा.पं.च्या ८ सदस्यांनी २१/९/२०२० रोजीच्या ग्रामपंचायत दापुराच्या विशेष सभेमध्ये अविश्वासाचा ठराव पारित केला होता. त्यामुळे सचिव ग्रा.पं. दापुरा यांनी सरपंच या पदाचा रिक्त पदाचा अहवाल वरिष्ठाकडे पाठविला होता. नितीन भगवान वानखडे यांनी २१/९/२०२० रोजीच्या अविश्वास ठरावास दि.२५/१०/२०२० रोजी जिल्हाधिकारी अकोला यांच्या न्यायालयात आव्हान दिले होते .त्यानंतर दि.२८ आक्टो २०२० च्या शासन निर्णयानुसार थेट निवडून आलेल्या सरपंच यांच्या विरुद्ध अविश्वासाचा ठराव पारित झाल्यानंतर ग्रामसभेची मंजुरी आवश्यक आहे.त्यामुळे दि.४/११/२०२० रोजी नितीन भगवान वानखडे यांनी जिल्हाधिकारी,अकोला यांच्या न्यायालयात पुनर्निरीक्षण अर्ज दाखल करून २१/९/२०२० रोजीच्या विशेष सभेमध्ये पारित झालेला सरपंच ग्रा.पं.दापुरा यांचेविरुद्धचा अविश्वासाचा ठराव दापुरा ग्रामपंचायत ची ग्रामसभा होऊन त्यावर निर्णय होईपर्यंत सरपंचा विरुद्धचा अविश्वासाच्या ठरावास स्थगिती दिली व विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात येऊन त्यात ग्रामपंचायती द्वारे पारित झालेल्या अविश्वास ठरावाला ग्रामसभेसमोर ठेऊन गुप्त मतदानाद्वारे पारित झालेल्या अविश्वासाच्या ठरावाला ग्रामसभेसमोर ठेवून गुप्त मतदानाद्वारे या अविश्वासाच्या प्रस्तावावर चर्चा घडवून त्याबाबत ग्रामसभेचा निर्णय प्राप्त करून घ्यावा असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अकोला यांना दिले. या प्रकरणी सरपंच नितीन वानखडे यांची बाजू अड.संतोष रहाटे यांनी मांडली तर अविश्वासाच्या ठराव पारित करणाऱ्या सदस्याची बाजू अड. अभय थोरात यांनी मांडली