अकोला (प्रतिनिधी)- अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद अकोला जिल्ह्याच्या वतीने समता परिषदेचा २८ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, दरम्यान समता परिषदेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ समता सैनिक व उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. या सन्मान सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी समता परिषदेचे राज्य सरचिटणीस माजी आमदार प्रा.तुकाराम बिडकर हे होते. तर प्रमुख उपस्थिती माजी आमदार मा. हरिदासजी भदे , माजी आमदार मा. बळीरामजी सिरस्कार , समाजसेवक प्रा.डाॅ. संतोषजी हुशे, जिल्हा अध्यक्ष प्रा.सदाशिव शेळके, महीला जिल्हाध्यक्षा माया ईरतकर, महानगर अध्यक्ष प्रा श्रीराम पालकर महानगराध्यक्षा ज्योती भवाने, सुमित्राताई निखाडे, महानगर कार्याध्यक्ष ऊमेश मसने, जिल्हा कार्याध्यक्षा सौ.दिपमाला खाडे, महानगर कार्याध्यक्षा कु कल्पना गवारगुरु,यांच्या प्रमुख ऊपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातिला,समता परिषदेचे खंदे समर्थक स्व डाॅ. जगन्नाथ ढोणे यांना भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. या प्रसंगी शंकरराव गिर्हे, रामदास खंडारे विलास वरोकार, मनिष हिवराळे, सौ.ऊज्वला बोळे, संजय हुशे, संतोष अढाऊ, लक्ष्मण निखाडे, सौ.प्रतिभा शिरभाते डाॅ,विजय ईंगळे यांचा या वेळी कृतज्ञतापूर्वक सत्कार करण्यात आला.तसेच जिल्ह्यातील समता परिषदेचे पदाधिकारी पुरुष व महिला यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी प्रा.श्रीकृष्ण बोळे, किशोर सोनोने, गजानन बारतासे,संजय तायडे. प्रा दिलीप आप्तुरकर. जग् तजीवन पल्हाडे, बोरोडे,श्री डांगरे, चक्रधर राउत.सौ. ज्योती निखाडे, सुदेष्णा नावकार, जोत्स्ना सदांशीव, सुनील ढाकोलकार, आदि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा सदाशीव शेळके, कार्यक्रमाचे संचलन प्रा अशोक भराड यांनी तर श्री ऊमेश मसने यांनी ऊपस्थितांचे आभार मानले.