अकोट(देवानंद खिरकर) – मा.जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अधिन असलेले आमचे बियाणे परवान्या अंतर्गत आम्ही वेगवेगळ्या सर्व कंपन्याचे सिल बंद प्रमाणीत बियाणे विकत असतो.या मधिल सोयाबीन उगवण तक्रार अंतर्गत आम्ही आज परंत दोन वेळा खुलासा दिल्या नंतरही विक्रेत्यांना कोर्टात हजर राहण्याच्या नोटिस आलेल्या आहेत.पहिल्या दोन खुलासा नंतर कोर्ट कारवाई अगोदर आमच्याशी चर्चा करणे अपेक्षीत होते.तरिही आमचे संघटनेचे पदाधिकारी दि.263/10/2020 रोजी भेटले असता अधिक्षक यांनी आम्हाला वरुन प्रेशर असल्यामूळे कारवाई होणारच आहे असे सांगितले.विभागा कडून वारंवार होणार्या कारवाई मुळे व खुलासा देवूनही समाधान होत नसल्यामुळे आमच्या सर्व सभासदांनी एक मतांनी आज जिल्ह्यातील सर्व विक्रेते आपले बियाणे परवाने तालुका कृषी अधिकारी यांना परत देवू व बियाणे विक्री बंद करु असे पत्र सुध्द मा.जिल्हा कृषी अधिकारी यांना दिले आहे.या बाबतचे आज अकोट तहसीलदार यांना निवेदन दिले आहे.निवेदन देतेवेळी प्रताप कुलट,राहुल मानकर,कपिल वानखडे,साहेबराव गावंडे,शरद निखाडे,नंदलाल राय,सुरेश मामा बोंडे,जुगलशेठ झुनझूनवाला,सुधिर सपकाळ,प्रमोद मोहोकर,यांच्या सह सर्व कृषी सेवा केंद्र मालक उपस्थित होते.