• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, March 21, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

घरकुल प्रकरणी तसेच विविध मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे यांची सपत्नीक शेकडो लाभार्थ्यांसह आमरण उपोषणाला सुरवात …

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
October 19, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, फिचर्ड, राज्य
Reading Time: 1 min read
79 1
0
शिवसेना
12
SHARES
572
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोट(देवानंद खिरकर )-अकोट नगर परिषदेतील घरकुल प्रकरणी तसेच विविध मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचेयांनी सपत्नीक शेकडो लाभार्थ्यांसह तसेच शिवसैनिकांसह नगरपरिषद कार्यालय अकोट परिसरात छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन अपंग बांधव कैलास वानखडे यांच्या हस्ते करून आमरण उपोषणाला सुरवात केली आहे.
नगर परिषदेमधील घरकुल योजनेचा लाभ गरजु नागरीकापर्यंत अद्यापही पोचलेला नाही.हे सतत निदर्शनास येत असुन शहरातील नागरीकांच्या या विषयावर सततच्या तक्रारी येत आहेत.त्याबाबत नगरपालिका महसूल विभाग तहसील कार्यालय यांना उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे यांनी स्वतः तसेच पत्नी नगरसेविका सौ.विजया दिलीप बोचे यांच्या माध्यमातून अनेक वेळा निवेदन दिले.परंतु आज गोरगरीब जनतेविषयी कोणत्याही अधिकाऱ्याची भूमिका ही सकारात्मक दिसली नाही करीता उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे हे सपत्नीक शेकडो शिवसैनिकांसह नगर परिषद परिसरात आज दिनांक १९/१०/२०२० सकाळी ११:०० वाजता पासुन कोरोना प्रादुर्भाव परिस्थिती पाहता सामाजिक अंतर पाळत आवश्यक ती काळजी घेत

आमरण उपोषणाला सुरवात केली आहे.यावेळी या जनहिताच्या उपक्रमास उपोषणस्थळी विविध पक्षाचे नेते तसेच सामाजिक संघटनांचे पदाधिकारी यांनी भेट दिली त्यामध्ये प्रामुख्याने शिवसेनेचे मा.आमदार संजय भाऊ गावंडे,शिवसेना तालुका प्रमुख श्याम गावंडे,शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटिका मायाताई म्हैसने,शहर प्रमुख सुनील रंधे,जिल्हा परिषद सदस्य सौ.गीताताई मोरे,पंचायत समिती सदस्य सौ.हरिदिनी वाघोडे,पंचायत समिती सदस्य मुरलीधर खोटे,जेष्ठ शिवसैनिक विजय ढेपे,कांग्रेस चे माजी नगरसेवक संजय आठवले,रमेश पाटील खिरकर,शिवसेना आदिवासी तालुका अध्यक्ष सुभाष सुरत्ने,चेतन मर्दाने,रवींद्र केवटी,कदिर शहा,आदिवासी युवक संघटना जिल्हाध्यक्ष बबलू मोरे,शहर संघटक रोशन पर्वतकर,युवासेना तालुका संघटक कुणाल कुलट,यांनी भेट दिली.तसेच या जनहिताच्या उपोषणाला आज दिवसभरात विविध सामाजिक संघटनांनी आपला पाठिंबा जाहीर केला आहे.त्यामध्ये असंघटित कामगार संघटना काँग्रेस,महाराष्ट्र नाभिक महामंडळ,महाराष्ट्र सफाई कामगार संघटना,आदिवासी संघटना यांनी पाठिंबा दिला.यावेळी माजी नगरसेवक दिवाकर गवई,संगीता फुलंबरकर,मीनाताई पौड,गीता मोरे,सौ.किरण किल्लेदार,संजय भट्टी,प्रदीप कदम,प्रकाश गाडगे,प्रमोद जाधव,संकेत जाधव,प्रकाश मंगवानी,धीरज गावंडे,योगेश सुरत्ने,देवानंद मोरे,संजय पालखेडे,अमोल बरदखे,मंगेश निबोळकर,सोपान साबळे,विजय भारसाकळे,पिंटू वानखडे,गोविंद चावरे यांच्यासह शेकडो शिवसैनिक तसेच लाभार्थी उपस्थित होते.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

आज मागण्या खालीलप्रमाणे…
१)ज्या कुटूंबाकडे स्वताचे मालकीची जागा नसेल व त्यांचेकडे ताबा पावती असेल व ते अनेक वर्षापासुन नगरपरीषद हद्दीत वा नझूलच्या जागेवर राहतात त्यांना शासकीय जागांचा मालकी हक्क (लिज पट्टा) करुन पंतप्रधान आवास योजनेतून घरकूल देण्यात यावे.२)अकोट शहरातील व प्रभाग क्रमांक १० मधील पिढीजात वास्तव्य करीत असलेल्या अतिक्रमन धारकांना राहत्या जागेचा भाडेपट्टा करुण देण्यात यावा.३) रमाई घरकुल योजनेतील पात्र लाभार्थाना त्वरीत घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा ४)एकुण लाभार्थांपैकी शासकीय नियमावलीप्रमाने ५% अपंग लाभार्थांना घरकुल योजनेचा लाभ त्वरीत देण्यात यावा.५) ज्यांचेकडे स्वताच्या नावाने ७/१२, नमुना ‘ड’, कलेक्टर लेआउट, एस.डी.ओ. लेआऊट, तहसीलदार लेआऊट, गुंठेवारी जागा आहे.अशा अतिक्रमन धारकांचे अतिक्रमन नियमीत करुन त्यांना पंतप्रधान घरकुल योजनेचा लाभ देणयात यावा.६)अतिक्रमण धारकांचा डि.पी.आर. त्वरीत मंजूर करण्यात यावा.७) अकोट शहरातील जवळपास ४००० अर्ज घरकुल योजनेकरीता प्राप्त झाले असुन पैकी २०३८ प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत. परंतू त्यातील ४०० नागरीकांनाच अद्यापप्रयंत घरकुल योजनेचा लाभ देण्यात आला असून उर्वरीत १६३८ प्रकरणांचा त्वरीत निपटारा करावा.८)शेतकरी,शेतमजूर,अपंग,विधवा, परितक्त्या,निराधार या केशरी (APL) कार्डधारकांना प्राधान्य गटात समावेश करुन BPL दराने धान्यपुरवठा करण्यात यावा.९) साफसफाई कर्मचारी यांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा.

Tags: शिवसेना
Previous Post

पातूर व मुर्तिजापूर तालुक्यातील रास्तभाव दुकानाकरीता प्रस्ताव आमंत्रित

Next Post

हे तुमचे सरकार,शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही : मुख्यमंत्र्यांची ग्वाही

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मातोश्री निवासस्थान बॉम्बने उडवून देण्याची धमकी

हे तुमचे सरकार,शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही : मुख्यमंत्र्यांची ग्वाही

akola news

गाडेगाव सरपंच, उपसरपंच विरोधात अविश्वास ठराव पारित!

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.