मीडिया डेस्क- सिलेंडरची चोरी रोखण्यासाठी आणि योग्य ग्राहकाची ओळख पटवण्यासाठी घरगुती वापरासाठी आवश्यक असलेल्या एलपीजी सिलेंडरच्या होम डिलिव्हरीचे नियम बदलणार आहेत. व्यावसायिक वापरासाठीच्या सिलेंडरसाठी हे नियम लागू होणार नाहीत.
👉 काय आहे DAC सिस्टिम-
▪️ या नव्या सिस्टिमला DAC असं नाव देण्यात आलं आहे. त्याचा अर्थ डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड असा होतो.
▪️ बुकिंग करून सिलिंडरची घरापर्यंत डिलिव्हरी करताना त्यासोबत तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक कोड पाठवण्यात येईल.
▪️ तुम्ही डिलिव्हरी बॉयला जोपर्यंत हा कोड दाखवत नाही, तोपर्यंत सिलेंडर तुम्हाला मिळणार नाही.
📱 अजूनही मोबाईल नंबर अपडेट नसल्यास ‘हे’ करा-
📌 डिलिव्हरी बॉयकडे असलेल्या ॲपच्या मदतीनं मोबाईल नंबर अपडेट करा व त्यानंतर कोड जनरेट करता येईल. ग्राहकांना त्यांच्या घरी होणारी सिलेंडरची डिलिव्हरी ही त्या कोडवर अवलंबून असेल.
📌 या सिस्टिममुळे चुकीचा पत्ता आणि चुकीचा मोबाईल नंबर दिलेल्या ग्राहकांच्या अडचणी वाढतील, यामुळे सिलेंडरची चोरी रोखली जाऊ शकते.
तेल कंपन्या सर्वप्रथम ही नवीन यंत्रणा 100 स्मार्ट सिटीमध्ये लागू करणार आहेत. त्यानंतर हळूहळू इतर शहरांमध्ये ही यंत्रणा लागू होईल. जयपूरमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ही यंत्रणा लागू करण्यात आली आहे.