तेल्हारा (प्रतिनिधी)- महिलांवरील वाढते अत्याचार रोखण्यात ठाकरे सरकारला अपयश आले आहे त्यामुळे महिलांमध्ये प्रचंड असंतोष व संताप निर्माण झाला आहे गुन्हेगारांना जरब बसेल अशी कठोर पावले सरकार व पोलिसांनी उचलावीत अत्याचारांच्या वाढत्या घटनांची गंभीर दखल घ्यावी अशा अशयाच्या मागणी विस्तृत निवेदन भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेश महिला आघाडी उपाध्यक्ष नयनाताई मनातकार यांच्या मार्गदर्शनात तेल्हारा तालुका महिला आघाडी च्या अध्यक्षा मोनिकाताई वाघ यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने दिनांक 12 ऑक्टोंबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तेल्हारा तहसील मार्फत निवेदन दिले
शहरातील मनतकार पेट्रोल पंपा पासून निघालेल्या भाजपा महिला आघाडी आक्रमक आक्रोश मोर्चा ने तेल्हारा वासियांचे लक्ष वेधले डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान मार्गाने निघालेल्या मोर्चात महाराष्ट्रातील कुचकामी सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवेदनावर महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्षा नयना ताई मनतकार महिला आघाडी तालुकाध्यक्षा मोनिकाताई वाघ न प अध्यक्षा जयश्रीताई पुंडकरमाजी जिल्हा सरचिटणीस कल्पनाताई पोहणे न प शिक्षण सभापती आरती ताई गायकवाड स्वातीताई गंभीरे सुनिता बगाडे कल्पना उजाड अलका ताथोड सुवर्णा रोठे शोभाताई गावंडे स्नेहल शर्मा कमल पाथ्रीकर प्रतिभा बरिंगे उषा पाथ्रीकर ॲड रूपाली राऊत ज्योती चिकटे गोकूळा चौखंडे अरुणा चंदन अक्षता चिकटे शीला चिकटे किर्ती पिंगळे शारदा हिंगणकार मंगला गवई कल्पना उजाड कविता दबघगाव पूजा बोरडे लक्ष्मी गवई सुनंदा उजाड यांच्या सह्या आहेत भाजपा महिला आघाडीच्या महिला आघाडीच्या आक्रोश मोर्चात सहभागी झालेल्या मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती हे लक्षणीय होती आक्रोश आंदोलनात भाजपा जिल्हा सरचिटणीस केशव ताथोड जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहणे तालुका अध्यक्ष गजानन उंबरकार शहर अध्यक्ष महेंद्र गोयनका तालुका सरचिटणीस पुंजाजी मानकर धर्मेश चौधरी ज्ञानेश्वर सरप तालुका कोषाध्यक्ष विशाल भुजबले तालुका प्रसिद्धी प्रमुख रवी शर्मा शहर सरचिटणीस रवी गाडोदिया गजानन गायकवाड भा ज यु मो जिल्हा उपाध्यक्ष लखन राजनकर भाजयुमो शहर अध्यक्ष गणेश इंगोले शहर प्रसिद्धी प्रमुख राहूल मिटकरि गजानन नळकांडे संदीप पालीवाल न प बांधकाम सभापती सुनील राठोड न प नट नेते नरेश आप्पा गंभिरे अनुप मार्के श्रीकृष्ण पवार प्रकाश राखोंडे महादेव महाले पद्माकर आखरे मोहन चंदन अक्षय पदवाड राहुल झापर्डे संजय बगाडे शंकर भाकरे संजय थुटे तेजराव थुटे यांच्यासह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ता सहभागी झाले होते