पातूर (सुनिल गाडगे): केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्याकडे पातुर नगरपरीषद बांधकाम सभापती सौ.तुळसाबाई गाडगे यांच्या पत्राद्वारे पातुर शहरातील काही विकास कामांची मागणी पातुर विकास मंचचे मार्गदर्शक आणी सामाजीक कार्यकर्ते ठा.शिवकुमारसिंह बायस यांनी केली होती.
त्यामध्ये जिर्ण झालेल्या शहरातील वेशी यांचे पुनर्जीवन करणे , नाना साहेब मंदिरा समोरून जाणारा पातुर ते भंडारज या शेतमार्गाने जाणा-या रस्त्याचे खडीकरण आणी डांबरीकरण करणे , पातुर शहरातील विस वर्षापासुन बंद असलेल्या जिनिंग फॅक्टरीच्या जागेवर शहरासाठी मंजूर झालेले ग्रामीण रूग्णालय उभारणे इत्यादी मागण्यांचे लेखी निवेदन दिले होते.त्याची तात्काळ दखल घेवून केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी तसे त्यांच्या पत्राद्वारे अकोला जिल्हाधिकारी जितेन्द्र पापळकर यांना जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत वरील काम करण्यास कळवीले आहे व तसे आदेश दिले आहे.
निवेदन देतांना सामाजीक कार्यकर्ते ठा.शिवकुमारसिंह बायस , गणेश गाडगे , रितेश सौंदळे गुरूजी , नितिन खंडारे , रूपेश फलके , विनोद तेजवाल , नितिन वानखेड़े , पुंडलिक श्रीनाथ , सचिन परमाळे ,विष्णू बंड , सचिन बंड , सोनु परमाळे , मेजर रवी श्रीनाथ , ऋषी दातिर , डिगांबर आयस्कार , राजू देवकर , अनिल म्हैसणे , लुकमान चिखलिकर , सैय्यद खालेक , इनायत खान , पिंटू बोंबटकार , विठ्ठल डिके , अक्षय निमकंडे इत्यादी मान्यवर उपस्थीत होते.