अकोला :- दोन लाखाच्या वसुलीसाठी आपल्याच नोकराचे अपहरण करून त्याचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी अकोल्यातील मद्य विक्रेता पुत्र अर्पित जयस्वाल व त्यांचे व्यवस्थापक रवी सातव यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणामुळे मद्य विक्रेत्याच्या अडचणीत वाढ झाली आहे.विशेष म्हणजे पोलिसांनी याप्रकरणी अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल केल्याने आता या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी करणार आहेत.
थोडक्यात हकीकत अशी आहे की, अकोल्यातील मद्य विक्रेत्याचा मुलगा अर्पित राजेंद्र जयस्वाल आणि मॅनेजर रवी सातवला, आपल्याच किरकोळ विक्री देशी दारूच्या दुकानात काम करणाऱ्या नोकराला,७ऑक्टोबर२०२०च्या अंदाजे १वाजता दरम्यान, अकोला शहरातील जुने शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या भागीरथ वाडी, येथे रहिवासी असलेल्या २लाखरुपयांची थकीत मद्याची रक्कम वसूल करण्यासाठी पाठविले होते. परंतु रक्कम वसूल न झाल्याने पित्त खवळलेल्या मद्य विक्रेताच्या मुलाने आपल्या मॅनेजर रवी सातव याच्या मदतीने,नोकर संजय जगदेव हातोले यांना बळजबरीने आपल्या महागड्या पांढऱ्या रंगाच्या कारने अपहरण केले होते. पीडित संजय जगदेव हातोले यांची प्रत्यक्ष भेटी दरम्यान दिलेल्या माहितीनुसार मद्य विक्रेताच्या मॅनेजरच्या सांगण्यावरून अवैद्य पणे देशी दारूची विक्री करणाऱ्या वेगवेगळ्या इसमांंना उधारीवर २ लाख रुपयांच्या देशी दारूच्या पेट्या देण्यात आल्या होत्या.परंतु उधारीवर देण्यात आलेल्या दारूची रक्कम वसूल करण्यात उशीर झाल्याने,मॅनेजरने हात वर करून मद्य सम्राटाला उधारीवर विक्री केलेल्या दारूची रक्कम दुकानात काम करणाऱ्या संजय जगदेव हातोले यांनीच हडप केल्याचे दर्शविले.
त्यावरून अर्पित जयस्वाल आणि मॅनेजर रवी सातव भागीरथ वाडीत रहिवासी असलेले संजय हातोले यांच्या घरी जाऊन अर्पित जयस्वाल याने वाशीम बायपास चौक स्थित एका देशी दारूच्या दुकानासमोरील रोडवरून महामार्ग, पोलीस मुख्यालय, दक्षता नगर चौक,शाहिद स्मारक चौक,नेहरू पार्क चौक,सिव्हिल लाईन चौक मार्गे आपल्या एका देशी दारू दुकानात नेऊन मारहाण केली. त्यानंतर मद्य विक्रेताच्या मुलाने त्या संजय हातोले यांना शासकीय दूध डेअरी समोरील आपल्या कार्यालयात नेऊन त्याठिकाणी मारहाण केली. नंतर मद्य विक्रेताच्या मुलाने आणि मॅनेजरने पीडित नोकराला त्याच्याच फोनवरून, त्याच्या मुलाला फोन लावून नोकराच बँक पासबुक आणि आधार कार्ड आणायला सांगितले. त्यावरून पीडित हातोलेचा मुलगा हा पासबुक आणि आधार कार्ड घेऊन, शासकीय दूध डेअरी जवळ जाऊन मुलाने नोकर संजय हातोले यांना फोन लावला असता, मद्य विक्रेताच्या मॅनेजर रवी सातव शासकीय दूध डेअरी समोर पीडित नोकराचा मोबाईल घेऊन आला आणि नोकराच्या मुलाला तुझ्या वडिलांनी फोन चार्जिंग साठी लावला आहे. आणि ते बाहेर कामानिमित्त गेले असल्याचे सांगत पासबुक आणि आधार कार्ड माझ्याकडे देऊन टाक असे म्हणून आधार कार्ड आणि पासबुक मॅनेजरने स्वतःकडे घेऊन मुलाला निघून जाण्यास सांगितले. त्यानंतर पिडीत नोकराला रामदास पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या एका ऑफिसमध्ये नेऊन पुन्हा मारहाण करण्यात आल्याची माहिती सुद्धा मिळाली आहे. त्यानंतर गड्डम प्लॉट येथील एका वकीलाच्या ऑफिस मध्ये नेऊन, संजय होतोले यांचे पातूर तालुक्यातील मौजे तुलंगा येथील गट नंबर१७० या शेताची इसार पावती २लाख रुपयांमध्ये केल्याची माहिती पीडित संजय हातोले यांनी दिली आणि त्यानंतर पीडित नोकराला७ नोव्हेंबर२०२०पर्यंत २लाखरुपये परत आले नाही तर, तुझ्या शेताची खरेदी करून, शेत हडपून टाकण्याची धमकी देण्यात आली होती.
हा सर्व प्रकार घडल्यावर, मद्य विक्रेताच्या मुलाने आणि मॅनेजरने पीडित नोकराला चारचाकी गाडीत बसवून त्याच्या डोळ्यांवर पट्टी बांधून एका अज्ञात स्थळी नेऊन त्याला विनाअन्नपाणी दाबून ठेऊन दुसऱ्या दिवसी३वाजता डोळ्यावर पट्टी बांधून जठारपेठ परिसरातील सातव चौकात सोडुन दिल्याची माहिती खुद्द पीडित हातोले यांनी दिली.आपली सुटका झाल्यावर घडल्या प्रकारची लेखी तक्रार पोलीस स्टेशन जुने शहर येथे पीडित नोकर गेला असता,त्याने लिहून आणलेली तक्रार न घेता, साधी मारहाणीची तक्रार दाखल करून,८ऑक्टोबर च्या मध्यरात्री नंतर कलम ३२४,५०४,३४नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.परंतु प्रसार माध्यमांनी घडलेला खऱ्या प्रकाराची माहितीला प्रसिद्धी दिल्यानंतर, पोलीस प्रशासन खळबडून जागे झाले, आणि या गंभीर प्रकाराची दखल जिल्हा पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी घेऊन कडक कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यावरून जुने शहर पोलिसांनी कलम ३४२,३६५ अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत