अकोला – आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 159 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 146 अहवाल निगेटीव्ह तर 13 अहवाल पॉझिटीव्ह आले. तसेच आज एक मयत झाले.
त्याच प्रमाणे काल (दि.10) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये तीन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 7808(6340+1313+155) झाली आहे. आज दिवसभरात 77 रुग्ण बरे झाले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 40431 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 39405 फेरतपासणीचे 208 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 818 नमुने होते. आजपर्यंत एकूण 40409 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 34069 तर पॉझिटीव्ह अहवाल 7808(6340+1313+155) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
आज 13 पॉझिटिव्ह
दरम्यान आज दिवसभरात सात जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आज सकाळी 13 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात चार महिला व नऊ पुरुष आहेत. त्यातील पैलवाडा येथील दोन जण, तर उर्वरित निंबा, भीम नगर, गजानन नगर, खडकी, केशव नगर, किसरा कॉलनी, बाळापूर, वाल्मिकी नगर, बाळापूर नाका, कापसी ता. पातूर व जिएमसी क्वॉटर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तसेच आज सायंकाळी कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. तसेच काल रात्री रॅपिड ॲटीजेन टेस्टमध्ये तीन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. कृपया नोंद घ्यावी.
77 जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून 19 जणांना, ओझोन हॉस्पीटल येथून एक जण,अकोला ॲक्सीडेंट क्लिनिक येथून एक जण, सुर्याचंद्रा हॉस्पीटल येथून एक जण तर हॉटेल रिजेन्सी येथून एक जणांना, तसेच होमक्वारंटाईनचा कालावधी पूर्ण झालेले 54 जण, अशा एकूण 77 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.
एक मयत
दरम्यान आज एकाचा मृत्यू झाला. हा रुग्ण मुंडगाव, ता. अकोट येथील 78 वर्षीय पुरुष असून ते 5 ऑक्टोंबर रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेताना मृत्यू झाला.
506 रुग्णांवर उपचार सुरु
आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 7808(6340+1313+155) आहे. त्यातील 255 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 7047 संख्या आहे. तर सद्यस्थितीत 506 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.