तेल्हारा(प्रतिनिधी)-तेल्हारा तालुक्यातील वारी भैरवगड वान प्रकल्पाची सध्याची टक्केवारी ९७.१५% असल्याने आज दि ११ ऑक्टोबर रोजी हवामान खात्या द्वारे अतिवृष्टी बाबत इशारा देण्यात आलेला आहे त्या नुसार सर्व वान नदी काठच्या लोकांना सूचित करण्यात आले की वान धरणा मध्ये पाणी येण्यास सुरू असून नदी पात्रा मध्ये वान प्रकल्पाचे द्वार उघडण्यात आले आहे.नदी काठावरील लोकांनी सतर्क राहावे अशा आवाहन वाण प्रकल्प विभागाने केले आहे.