अकोट (देवानंद खिरकर)- आज दिनांक ८/१०/ २०२० रोजी अकोट तालुक्यातील ओबीसी संघर्ष समिती व विविध समविचारी संघटना यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी श्री देशपांडे साहेब यांच्यामार्फत मुख्यमंत्री साहेब यांना निवेदन देण्यात आले. निवेदनाद्वारे खालील मागण्या करण्यात आल्या. ओबीसी समाजातील सर्व जातनिहाय जनगणना करण्यात यावी, मेगा नोकर भरती तात्काळ सुरू करावी, ओबीसींना पदोन्नतीमध्ये आरक्षण सुरू करावे, ओबीसी यांनी निर्माण केलेल्या संस्था व महामंडळास एक हजार कोटी रुपये त्वरित द्यावे, ओबीसी विद्यार्थ्यांना रखडलेली शिष्यवृत्तीची रक्कम देण्यात यावी, व विद्यार्थी वस्तीगृह सुरू करण्यात यावे, अशा प्रकारच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. निवेदन देण्याकरिता ओबीसी संघर्ष समितीतर्फे रमेश आकोटकर हरिनारायण माकोडे (अध्यक्ष न. प. अकोट) डॉ. गजानन महल्ले श्यामसुंदर भगत, निलेश राधेश्याम झाडे (उपसभापती प. स. अकोट) मंगेश चिखले (नगरसेवक) मंगेश लोणकर (नगरसेवक) गजानन धर्मे (माजी सरपंच) केशवराव बिलबिले, राजेश भालतिलक, निलेश काळे, योगेश श्रीराम नाथे, विलास बोडखे, उमेश हेंड, गजानन थोरात, नितीन टोलमारे ,मोहन बेराड, राधेश्याम बोडखे, ज्ञानेश्वर घायल, रामकृष्ण मिसाळ, विवेक धुळे, बाळासाहेब घावट, संजय राहटे, सचिन वडतकर, धनंजय जालंदर, पंकज श्रीवास्तव, वसंत नेमाडे, विजय ढेपे ,सुनील देठे ,अशोक हिरुळकर, वासुदेव भास्कर, शंकरराव पूंडकर, देवानंद गयधर, बंटी पांडे, पुष्पक चेडे, अक्षय रोही, सागर बोरोडे यांच्यासह विविध ओबीसी संघटनांचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते