• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, February 10, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

ख्रिश्चन समाजाच्या मालकीची शेतजमीन हडपण्याचा डाव!,जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांना निवेदन

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
October 8, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, फिचर्ड, राज्य
Reading Time: 1 min read
77 1
0
जमीन
18
SHARES
555
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला(प्रतिनिधी)- राष्ट्रीय महामार्ग सहावरील मौजे काटेपूर्णा, कुरणखेड येथील दि ख्रिश्चन अ‍ॅण्ड मिशनरी अलायन्स चर्च ऑफ इंडिया, महाराष्ट्र सिनड पी.टी.आर.डी-१ या संस्थेच्या मालकीच्या ४२ एकर जमिनीवर अनधिकृतपणे कब्जा करण्याचा प्रयत्न करणारा आरोपी गुरुचरणसिंग अंधरेले आणि त्याचे गुंड साथीदार तसेच या सर्व आरोपींना पाठीशी घालणारे बोरगावमंजू पोलिस स्टेशनचे ठाणेदार हरीश गवळी यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी या मागणीसाठीचे निवेदन बुधवार, ७ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील समस्त ख्रिश्चन समाजाच्यावतीने जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर आणि पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांना सादर करण्यात आले. कारवाई न केल्यास येत्या शनिवार, १० ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आंदोलन आणि साखळी उपोषण करण्याचा इशाराही या निवेदनातून देण्यात आला आहे. डॉ. प्रमोद इंगळे आणि धर्मगुरूंनी यावेळी जिल्हाधिकारी पापळकर यांच्यासोबत सविस्तर चर्चा करून परिस्थितीशी अवगत केले.

मौजे काटेपूर्णा, कुरणखेड ता.जि.अकोला येथे सदर संस्थेची सुमारे ४२ एकर शेतजमीन गट क्र.३३० क्षेत्रफळ १० हेक्टर ३६ आर व गट क्र. ६४ क्षेत्रफळ ६ हेक्टर ११ आर आकारणी ४६ स्थित आहे. दि खिश्चन अ‍ॅन्ड मिशनरी अलायन्स चर्च ऑफ इंडिया, महाराष्ट्र सिनड पी.टी.आर.डी-१, अकोला यांच्या मालकीची व ताब्यातील ७/१२ उताऱ्यावर नमूद शेतजमीन आहे. प्रभुदास दौलतराव इंगळे, रा.म्हाडा कॉलनी, अकोला यांना सदर संस्थेच्यावतीने विश्वस्थांनी सदर शेत जमिनीचा वाहितीचा करारनामा सन २०१९ ला व विशेष मुखत्यार पत्र सन २०२० साली दिले आहे. आरोपी गुरुचरणसिंग अंधरेले हा खिश्चन संस्थेच्या मालकीच्या व ताब्यातील शेतजमिनीवर अनधिकृतपणे व बळजबरीने अतिक्रमण करुन ताबा मिळविण्याचा प्रयत्न करीत असून, त्याने कट कारस्थान रचून खोटे व बनावटी दस्तावेजही तयार केले आहेत. संस्थेच्या मालकीच्या शेतजमीन, मालमत्तेचा अपहार केल्याबाबत तसेच कुरणखेड येथील शेतजमिनीवर संस्थेच्या नावाचा लावलेला लोखंडी बोर्ड चोरून त्याची विल्हेवाट लावल्याबद्दल गुरुचरणसिंग अंधरेले व त्याचे गुंड साथीदार तसेच शेतातील पिकाची रखवाली करून पिकाचे उत्पन्न घेणारे विष्णू पवार आणि राजू भेंडकर यांच्याविरुध्द कठोर कायदेशीर कारवाई करण्यासंदर्भात बोरगावमंजू पोलिस स्टेशनला लेखी तक्रार दाखल केली आहे. परंतु बोरगाव मंजू पोलिस स्टेशनचे ठाणेदार यांनी आरोपींवर कोणतीही कारवाई न करता त्यांना मोकाट सोडले असल्यामुळे आरोपी गुरुचरणसिंग अंधरेले व त्याचे गुंड साथीदार यांच्यापासून आमच्या जीवाला धोका असून, बोरगाव मंजूचे ठाणेदार हे आरोपींना पाठीशी घालीत असल्याने आरोपींसह ठाणेदारावरही कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. सदर आरोपी आणि ठाणेदार यांच्यावर त्वरित कारवाई न झाल्यास या मागणीसाठी ख्रिश्चन समाज बांधव आणि भगिनी येत्या शनिवार १० ऑक्टोबर २०२० रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण करू, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदन देताना ख्रिश्चन धर्मगुरू रेव्हरंड आशिष बिजोरीकर, याकोब इंगळे, शैलेश जगधने, राहुल हिवरे, दीपक शेजे, मोजेस वानखडे यांच्यासह डॉ. प्रमोद इंगळे, सुनील डेव्हीडसन, अनुप डेव्हीडसन, विलास चौथमल, जॉन्सन वरघट, रॉबिन्सन वरघट, प्रभूदास इंगळे, तुषार मडामे, शलमोन कदम, स्वरूप घाटगे, जेम्स स्वामी, रविकांत डेव्हीडसन, सुशील डेव्हीडसन, निलेश पवार, सुधीर डेव्हीडसन, सुधीर प्रधान, वैभव चव्हाण, जॉय भिसे, देवानंद साळवे आदिंची उपस्थिती होती.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

Tags: जमीनशेतजमीन
Previous Post

कोरोना : शाळा १५ ऑक्टोबरपासून टप्प्याटप्प्याने सुरू होणार

Next Post

कोरोना नव्हे तर उपासमारीनेच मरण्याची वेळ!मंडप बिछायत असोसिएशनचे धरणे आंदोलन

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
आंदोलन

कोरोना नव्हे तर उपासमारीनेच मरण्याची वेळ!मंडप बिछायत असोसिएशनचे धरणे आंदोलन

मास्क

"नो मास्क नो सवारी" नंतर अकोला पोलिसांची आता" नो मास्क नो राईड" मोहीम

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.