• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, February 3, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home कोविड १९

358 अहवाल प्राप्त; 23 पॉझिटीव्ह, 174 डिस्चार्ज, दोन मयत

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
October 2, 2020
in कोविड १९, Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, फिचर्ड, राज्य
Reading Time: 1 min read
77 1
0
अहवाल पॉझिटीव्ह
12
SHARES
558
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला – आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 358 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 335 अहवाल निगेटीव्ह तर 23 अहवाल पॉझिटीव्ह आले. तसेच आज दोन मयत झाले.

त्याच प्रमाणे काल (दि.1) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 24 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 7572(6181+1236+155) झाली आहे. आज दिवसभरात 174 रुग्ण बरे झाले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 39380 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 38399, फेरतपासणीचे 208 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 773 नमुने होते. आजपर्यंत एकूण 38799 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 32618 तर पॉझिटीव्ह अहवाल 7572(6181+1236+155) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आज 23 पॉझिटिव्ह

दरम्यान आज दिवसभरात 23 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात आज सकाळी 15 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात सात महिला व आठ पुरुष आहे. त्यातील जठारपेठ व डोंगरगाव येथील प्रत्येकी तीन जण, संतोष नगर येथील दोन तर उर्वरित कौलखेड, मलकापूर, लक्ष्मी नगर, भागवत वाडी, मुरारका मेडिकल, देशमुख फाईल, वाडेगाव येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तसेच आज सायंकाळी आठ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात दोन महिला व सहा पुरुष आहे. त्यातील राधकीसन प्लॉट येथील दोन जण तर उर्वरित कौलखेड, जानोरी, शिवनगर, अंबिका नगर, खडकी बार्शीटाकली व नवीन बसस्टँड जवळ येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. तसेच काल रात्री रॅपिड ॲटीजेन टेस्टमध्ये 23 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. कृपया नोंद घ्यावी.

दोन मयत

दरम्यान आज दोन जणाचा मृत्यू झाला. हा रुग्ण गितानगर, अकोला येथील 72 वर्षीय पुरुष असून तो दि. 23 सप्टेंबर रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला. तर तिवसा बार्शीटाकली येथील 62 वर्षीय महिला असून ती 19 सप्टेंबर रोजी दाखल झाली होती. तिचा उपचार घेतांना मृत्यू झाला.

174 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून 24 जणांना, कोविड केअर सेंटर अकोला येथून 15 जण, उपजिल्हा रुग्णालय, मुर्तिजापूर येथून पाच जण,आयकॉन हॉस्पीटल येथून चार जण, अवघते हॉस्पीटल मुर्तिजापूर येथून तीन जण, सुर्याचंद्रा हॉस्पीटल येथून एक जण, आर्युवेदीक हॉस्पीटल येथून एक जण, हॉटेल रेजीन्सी येथून नऊ जण, तर हॉटेल स्कायलार्क येथून सहा जण, तसेच काल अकोला ॲक्सीडेंट क्लिनीक येथून एक जण व हॉटेल स्कॉयलार्क येथून पाच जण, तर होमक्वारंटाईनचा कालावधी पूर्ण झालेले 100 जणांना, अशा एकूण 174 जणांना डिस्चार्ज देण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.

1122 रुग्णांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 7572(6181+1236+155) आहे. त्यातील 241 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 6209 संख्या आहे. तर सद्यस्थितीत 1122 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

Tags: अहवाल पॉझिटीव्ह
Previous Post

एसटी कर्मचाऱ्यांचे थकित वेतन लवकरच देणार : अनिल परब

Next Post

रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 112 चाचण्या, सात पॉझिटिव्ह

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
रॅपिड ॲन्टीजन टेस्ट

रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 112 चाचण्या, सात पॉझिटिव्ह

रेल्वे

मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर दोन महिलांची मालगाडीसमोर उडी घेऊन आत्महत्या!

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.