बाळापूर (पंकज इंगळे)- उत्तर प्रदेशातील हाथरस येथील तरुणीवरील सामूहिक अत्याचाराचे प्रकरण आणि पीडित तरुणीचा काल मृत्यू झाल्याची घटना अत्यंत क्लेशदायक, संतापजनक व लाजिरवाणी आहे. असं अमानूष कृत्य करणाऱ्यांना त्यांच्या कृत्यापेक्षाही कठोर फाशी ची शिक्षा झाली पाहिजे करिता वंचित बहुजन आघाडी च्या वतीने आज तहसीलदार साहेब बाळापुर यांना निवेदन देण्यात आलेत,यावेळी रूपालिताई मंगेश गवई,(सभापती पंचायत समिती बाळापूर) इंदूताई वानखडे(तालुकाध्यक्ष महिला आघाडी),रेखा ताई अंभोरे( माजी जि.प सभापती समाजकल्याण,अकोला), मंगेश गवई,पदमाकर तायडे,भुषण पातोडे,शारीक पटेल,मनोज गवई,रामराव सावळे, सुहास इंगळे, संजय उमाळे,गणेश सुरजुसे, भास्कर शिरसाट,सिद्धार्थ डोगरे, सुबोध डोगरे,प्रेम इंगळे, सुगत डोगरे,राजेश वानखडे,कादिर भाई मिस्त्री,दत्ता जयले,गुलाबराव उमाळे,वेणूताई उमाळे,कुसुमबाई वानखडे,श्रावण मात्र व इत पदाधिकारी , महिला उपस्थित होते.