अकोला – गावोगावी रुग्णवाहिकेची गरजच पडू नये अशी व्यवस्था निर्माण होणे आज गरजेचे असून कोरोणाला हद्दपार करण्यासाठी जिल्हा प्रशासन सकारात्मक पावले उचलत आहे. आज राज्यामध्ये सार्वजनिक विचारातून काम झाले पाहिजे जेणेकरून सर्वांनी माझे कुटुंब माझी जबाबदारी स्वीकारत नियमांचे पालन करून कोरोणाचीही लढाई जिंकने महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन राज्यमंत्री जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी केले.
परंपरेतून खूप काही करता येतं याच उत्तम उदाहरण आमदार अमोल मिटकरी यांनी त्यांचे वडील स्मृतीशेष रामकृष्ण आप्पाजी मिटकरी यांच्या पुण्यस्मरणानिमित्त पंचक्रोशीसाठी रुग्णवाहिका लोकार्पनातून दिसून येते. आज देशात मंदिरे उभारण्यापेक्षा शाळा अधिक सक्षम करणे गरजेचे असल्याचे विचार पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू यांनी व्यक्त केले. ते स्मृतीशेष रामकृष्ण आप्पाजी मिटकरी पुण्यस्मरनानिमित्त रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्यात बोलत होते
यावेळी विधानपरिषदेचे सदस्य आमदार अमोल मिटकरी,जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सुरेश आसोले, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, गोदावरीताई मिटकरी उपस्थित होते.