अकोट(देवानंद खिरकर)- स्वातंत्र्याला ७४ वर्ष उलटली मात्र गावखेड्यातील वाहतूक परिस्थिती अजून हि नाही पालटली.देशात समृद्धी महामार्गासाठी अतोनात पैसा खर्च करणारे सरकार मात्र ग्रामीण भागात रस्ता सुद्धा देत नाही.अकोल्यातील प्रसूती झालेल्या महीलेला व तिच्या बाळाला उपचारासाठी कावसा प्राथमीक आरोग्य केंद्रात बैल बंडीने न्यावे लागले ही दुर्देवी घटना लोकप्रतिनिधींच्या नजरेस कशी पडली नाही. हे आश्चर्च आहे.अकोल्याच्या अकोट तालुक्यातील पनोरी येथील निता प्रवीण फुकट या महिलेला प्रसूती वेदना व्हायला लागल्या.पोट दुखत असल्याने दवाखान्यात नेण्यासाठी गावाच्या बाजूला असलेले पठार नदीवर आल्यावर नदीला दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पूर आला.आणि गावामधून बाहेर जायला दुसरा मार्ग सुद्धा नव्हता. त्यामुळे त्या महिलेला खूप त्रास सहन करावा लागला. शेवटी गावातील आशा यांनी त्या महिलेची घरीच प्रसूती केली.पंरतु, खबरदारी म्हणून सकाळी त्या महीलेला कावसा प्राथमीक आरोग्य केंद्रात गावातील बैल बंडीने न्यावे लागले हे दुर्देवच म्हणावे लागेल. एकाच पावसात या गावाचा संपर्क तुटतो.गावाला जोडणारा दुसरा कुठला ही मार्ग नसल्याने गावकरी चिंतेत आहेत.या गावाला जोडणाऱ्या पुलाचे काम लवकरात लवकर झाले नाही. तर पुलावर बसुन आंदोलन करु असा इशारा गावकरी यांच्या वतिने देण्यात आला आहे. लोकप्रतिनिधी गावाकडे येतात आणि मोठं मोठी आश्वासन देऊन जातात आणि दिल्ली दरबारी मोठं मोठ्या बाता करून मोकळे होतात.मात्र प्रत्यक्षात कुठलच काम होत नसल्याने. ग्रामीण भागातील जनतेला हाल सोसावे लागतायेत. यावरही गावकऱ्यांचा द्राविडी प्राणायाम संपत नाही. कारण पीएचसीमध्ये पोहोचल्यावर डॉक्टरही हजर नव्हते आणि रुग्णाला अकोला न्यायला एमबुलन्सही नव्हती.