पातूर (सुनिल गाडगे) – तालुक्यातील ग्राम आस्टूल येथील काही नागरिकांनी घरकुल न बांधता घरकुल चा संपूर्ण निधी लाटला असून दोषीवर कारवाई करण्याच्या मागणी करीता आस्टूल येथील धम्मपाल इंगळे यांनी दिनांक 21 सप्टेंबर पासून पातूर पंचायत समिती समोर आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि आस्टूल येथे घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थीकडून अर्ज मागविले होते. त्यात नियुक्त झालेल्या काही लाभार्थीनी घरकुल चा पहिला हफ्ता घेतल्यानंतर सुध्दा कुठलेही बांधकाम लाभार्थीयांनी केले नाही. त्यानंतर त्यांना दुसरा हफ्ता मिळू शकत नाही. परंतु तसें न करता व मोका पाहणी न करता लाभार्थी यांना दुसरा व अंतिम हफ्ता सुद्धा देण्यात आला वास्तविक मध्ये घरकुल लाभार्थी यांनी घरकुल चे बांधकाम न करता संपूर्ण निधी लाटला तसेच याबाबत तक्रारकरते यांनी यापूर्वी बऱ्याच वेळ तक्रारी करून सुद्धा त्यांच्या तक्रारी ला केराची टोपली दाखवीण्यात आली असून शेवटी आज पातूर पंचायत समिती समोर तक्रारकरते धम्मपाल इंगळे यांनी आमरण उपोषणास सुरवात केली असून दोषीवर तात्काळ कारवाई ची मागणी निवेदनद्वारे केली आहे.