अकोला (प्रतिनिधी) – संसदेत चर्चा न करता हुकूमशाही पद्धतीने अध्यादेश काढून शेतकरी विरोधी विधेयक पारित केल्याबद्दल स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती येथे अकोला जिल्हा युवक कॉंग्रेस तर्फे मोदी सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला.
यावेळी युवक काँग्रेस चे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केंद्र सरकारच्या विरोधात तीव्र निदर्शने व घोषणाबाजी करीत निषेध नोंदवला.
या निषेध आंदोलनामध्ये अकोला जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेसचे अध्यक्ष एडवोकेट महेश गणगणे शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष अंशुमन देशमुख शहर काँग्रेसचे महासचिव कपिल रावदेव प्रदेश युवक काँग्रेसचे सागर कावरे नगरसेवक पराग कांबळे अक्षय ईनामदार जिल्हा युवक काँग्रेसचे महासचिव विषाल इंगळे राहुल थोटांगे राम पाचपोर मयूर देशमुख गणेश टाले गजानन आसोलकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते